Tesla Automatic Car Uncontrol Video Viral On Social Media: जगभरात दरवर्षी रस्ते अपघातात अनेकांचा मृत्यू होतो. या अपघातांना अनेकदा खराब रस्ते, बेदारकपणे गाडी चालवणं जबाबदार असतं. त्यामुळे ऑटोमॅटिक कारमुळे हा प्रश्न सुटेल असं अनेकांचं म्हणणं होतं. विना ड्रायव्हर कारमुळे वाहतुकीला शिस्त लागेल, असा एक मतप्रवाह तयार झाला आहे पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे ऑटोमेटिक कारबाबत तुमचं मत बदलून जाईल. ऑटोमेटिक मोडसाठी कोण जबाबदार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. ऑटो मोडमध्ये गाडी विना ड्रायव्हर रस्त्यावर धावत असते. टेस्लाच्या गाड्या ऑटो मोडसाठी प्रसिद्ध आहेत. जगभरातील कारप्रेमी ऑटो मोडसाठी या गाड्यांचं कौतुक करतात. पण टेस्लाची गाडी ऑटो मोडमध्ये असताना अनियंत्रित झाली आणि दोन जणांना जीव गमवावा लागला. त्याचबरोबर या स्थितीत अनेक जण गंभीर झाले आहेत. ब्रेक सिस्टम फेल झाल्याने ही दुर्घटना झाल्याचं बोललं जात आहे. 


टेस्लाच्या ऑटोमेटिक वाय मॉडेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना चीनच्या ग्वांगडोंग भागात घडली आहे. मागच्या आठवड्यात हा धक्कादायक प्रकार घडला. टेस्लाची ऑटोमेटिक वाय मॉडेल कार चालत असताना अचानक अनियंत्रित झाली आणि थांबण्याचं नावच घेतलं नाही. गाडीने धारण केल्याने रस्त्यावरील दोन जणांना चिरडलं तर अनेक जण जखमी झाले आहेत. काही वेळानंतर गाडीचा वेग आणखी वाढला आणि एका इमारतीच्या भिंतीला धडकली आणि स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. 



बातमी वाचा- MG Air इलेक्ट्रिक कारचा लाँचिंगपूर्वीच बोलबाला, सिंगल चार्जवर कापणार 300 किमी अंतर


45 सेकंदाचा हा व्हिडीओ झा नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, "ऑटोपायलट मोडमध्ये असताना ब्रेक दाबू शकत नाही का?" दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "टेस्ला सोडा आता ट्विटरदेखील एलोन मस्क यांच्या हातात आहे." कंपनीच्या म्हणण्यानुसार, टेस्लाच्या मॉडेल वाय कारच्या भीषण अपघाताचा तपास करण्यासाठी कंपनी पोलिसांना मदत करेल. टेस्ला कारला अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.