तरुणी म्हणाली, `मी इतकी सुंदर, काय करु?`; त्यानंतर लोकांची ही `अजब` मागणी
Instagram Reels Video: इंस्टाग्रामवर बरेच लोक रिल्स बनवतात. एका सुंदर तरुणीचा असा एक रिल्स चर्चेत आहे.
मुंबई : Instagram Reels Video: इंस्टाग्रामवर बरेच लोक रिल्स बनवतात. या दरम्यान काही लोकांचे बरेच रिल्स व्हायरल होतात. इंस्टाग्रामवर दररोज काही न काही रील ट्रेंडमध्ये येतात. दरम्यान, एका सुंदर तरुणीचा असा एक रिल्स चर्चेत आहे. एक तरुणी 'मैं इतना सुंदर हूं क्या करूं' या गाण्यावर रील बनवत होती. यादरम्यान लोकांनी मुलीची चांगलीच फिरकी घेतली.
तरुणीकडे आधार कार्ड मागितले!
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, 'मी खूप सुंदर आहे, मी काय करू' या गाण्यातून तरुणी बोलत आहे, तेवढ्यात समोरून आवाज येतो की 'तुझे आधार कार्ड दाखव.' यानंतर, मुलीचा मूडच बदलतो आणि तिचा चेहरा पडतो. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रील बनवणारी तरुणी इथेच थांबते आणि नंतर ती रील बनवण्याचा प्रयत्न करत नाही.
सोशल मीडियावर लोकांमध्ये असा समज आहे की आधार कार्डमध्ये कोणाचाही फोटो चांगला नसतो. त्यामुळे आधार कार्डच्या फोटोबाबत अनेक प्रकारचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आधार कार्डचा फोटो दाखवून इतरांच्या सौंदर्याची खिल्ली उडवण्याबाबत अनेकजण बोलतात. तसेच या व्हिडिओत आहे.
लोकांना व्हिडिओ पाहून आनंद
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर supriya_9508 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'यार, आधार कार्ड मागू नका, खूप दु:ख होत आहे.' हा व्हिडिओ पाहून लोकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून बहुतांश लोकांनी हसून प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, 'मैं इतना सुंदर हूं क्या करूं' हे गाणे पंजाबी गायक मिलिंद गाबाने तयार केले आहे. हे गाणे त्याच्यासोबत परंपरा ठाकूरने गायले आहे. यामध्ये 'अश्नूर कौर'ने परफॉर्म केले आहे.