मुंबई : सोशल मीडिया मंचांवर प्रभावशाली व्यक्तींच्या माध्यमातून उत्पादने विक्रीचा ट्रेंड वाढत आहे. यासोबत देशातील सोशल मीडिया बाजार वर्षाच्या शेवटापर्यंत 900 कोटींचा व्यवसाय करण्याचा अंदाज आहे. ग्रुपम च्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. आयएनसीए इंडिया एन्फुएंसर रिपोर्टच्या मते सोशलमीडिया प्रभावकारी बाजार दर वर्षी 25 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. तसेच वर्ष 2025 पर्यंत या क्षेत्रात व्यवसाय 2200 कोटींपर्यंत पोहचू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टमध्ये म्हटले की, इंटरनेटची व्यापकता वाढल्याने सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. याबाबत कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी सोशल मीडियातील प्रभावशाली लोकांसोबत प्रमोशन करणे सुरू केले आहे. ग्रुपमच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोविड 19 संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्राहकांशी थेट जोडले जाण्यासाठी प्रभावकारी उद्योग मोठ्या परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे.


सोशल मीडियावर लोकांची वाढती संख्या
ग्रुपमचे दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत कुमार यांनी म्हटले की, कोरोना संसर्गाच्या आधी भारतात वेगवेगळ्या सोशल मीडियावर साधारण 40 कोटी लोक होते. मागील 18 महिन्यांमध्ये सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कंपन्या सोशल मीडियावर प्रभावशाली व्यक्तींच्या माध्यमातून आपल्या प्रोडक्टच्या जाहिराती करीत आहेत. प्रभावशाली व्यक्तींचे लोकांशी असलेला संपर्काचा उपयोग आपल्या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी करीत आहेत. हे एक मोठे बिझनेस मॉडेल बनू पाहत आहे.