मुंबई : व्हॉट्सअॅपवर गेल्या काही दिवसांत अनेक नवे फिचर्स आले आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरच युजर्सला आता फेसबुक अॅपवरच व्हॉट्सअॅपचं एक शॉर्टकट बटन मिळणार आहे. फेसबुक आपल्या अॅपवर एक अशा फिचरचं टेस्टिंग करत आहे ज्याच्या मदतीने युजर एका क्लिकवर फेसबुकवरुन व्हॉट्सअॅपवर स्विच करु शकणार आहेत.


अमेरिकेतील प्रसिद्ध वेबसाईट द नेक्स्ट वेबने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुक अॅपच्या मेन्यूमध्ये हे शॉर्टकट बटन दिलं जाणार आहे. सध्या या फिचरचं टेस्टिंग सुरु आहे. फेसबुकचं अँड्रॉईड अॅप वापरणाऱ्या काही युजर्ससाठीच हे फिचर सध्या उपलब्ध आहे. हे बटन आता डेनिस भाषेत आहे. फेसबुकतर्फे या फिचरसंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.


या बटनचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, फेसबुक अॅपला बंद न करता युजर्स व्हॉट्सअॅपवर जाऊ शकणार आहेत. असे करण्यामागे कंपनीचे दोन उद्देश असल्याचं दिसत आहे. पहिलं म्हणजे या फिचरच्या माध्यमातून फेसबुक आपली सहयोगी कंपनी व्हॉट्सअॅपचे युजर्स वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरा उद्देश असा की, व्हॉट्सअॅपच्या युजर्सलाही फेसबुकसोबत कनेक्ट करणं.


कंपनीच्या मते, अमेरिका आणि इतरही काही देशांमध्ये असे नागरिक आहेत जे फेसबुकचा वापर करतात मात्र, व्हॉट्सअॅपपासून दूर राहत आहेत. या देशांमध्ये व्हॉट्सअॅप ऐवजी युजर्स गुगलचं अॅप, स्नॅपचॅट, वीचॅट आणि स्काईप वापरणं पसंत करतात.