हे अॅप्स तुमच्या फोनसाठी धोकादायक! डिलीट करा नाहीतर....
तुम्ही फोटो Editor App वापरता का? मग तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची
मुंबई : आपण फोनमध्ये हवे ते हवे तसे कोणतंही डिस्क्रिप्शन न वाचता App डाऊनलोड करतो. मात्र काही App आपल्या फोनसाठी धोकादायक आहेत. सध्या सगळंच ऑनलाईन व्यवहार होत आहेत. याचा गैरफायदा काही हॅकर्स घेत असून ते हॅकिंगसाठी या App ची मदत घेत आहेत.
आपल्या फोनमधील फोटो एडिट करण्यासाठी तुम्ही जर फोटो एडिट App वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. हे अॅप कोट्यवधी लोकांनी डाऊनलोड केले आहेत. या अॅपची जाहिरात देऊन तुमच्या फोनमध्ये व्हायरस सोडण्याचा डाव आहे.
गुगल प्लेस्टोरवरील असे काही App आहेत ज्यामध्ये व्हायरस सापडला आहे. त्यामुळे युजर्सना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जर तुमच्याकडे देखील हे अॅप असतील तर तातडीने डिलीट करा.
आतापर्यंत 36 App सापडले आहेत. हे App सिक्युरिटीच्या दृष्टीनं धोक्याचे ठरत आहेत. या अॅपद्वारे युजरचा डेटा चोरला जातो आणि त्याचा गैरवापर केला जातो. तुमच्या फोनमध्ये असे अॅप असतील तर आजच डिलीट करा.
पाहा कोणते App फोनसाठी सुरक्षेच्या दृष्टीनं हानिकारण
Photo Editor: Beauty Filter
Photo Editor: Retouch & Cutout
Photo Editor: Art Filters
Photo Editor – Design Maker
Photo Editor & Background Eraser
Photo & Exif Editor
Photo Editor – Filters Effects
Photo Filters & Effects
Photo Editor: Blur Image
Photo Editor: Cut Paste
Emoji Keyboard: Stickers & GIF
Neon Theme Keyboard
Cache Cleaner
FastCleaner: Cache Cleaner
Funny Wallpapers – Live Screen
Notes – reminders and lists
Call Skins – Caller Themes
Funny Caller
CallMe Phone Themes
InCall: Contact Background
MyCall – Call Personalization
Caller Theme
Funny Wallpapers – Live Screen
4K Wallpapers Auto Changer
NewScrean: 4D Wallpapers
Stock Wallpapers & Backgrounds.