चांगल्या सेल्फीसाठी खास टिप्स
सेल्फीची क्रेझ तरुणाईमध्ये इतकी वाढत चालली आहे की...
मुंबई : कुठलाही कार्यक्रम असो किंवा सण असो सध्याच्या काळात प्रत्येकजण हा सेल्फी घेण्यासाठी धडपड करताना आपल्याला पहायला मिळतं. सेल्फीची क्रेझ तरुणाईमध्ये इतकी वाढत चालली आहे की प्रत्येकवेळी 'एक सेल्फी तर झालाच पाहिजे' असं सहजासहजी ऐकायलाच मिळतं.
सेल्फी क्लिक करणारे शौकीन जगभरात पहायला मिळतील. एका रिसर्चनुसार हे समोर आलं आहे की, प्रत्येक दिवशी ९३ मिलियन (जवळपास ९ कोटी ३० लाख) जण सेल्फी क्लिक करतात. सेल्फी क्लिक करताना प्रत्येकाला वाटत असतं की आपला फोटो चांगला यावा. तुम्हालाही चांगला सेल्फि क्लिक करायचा असेल तर या टिप्स वापरा.
कॅमेऱ्याकडे पाहू नका:
एक्सपर्टच्या मते, एक चांगला आणि क्लासिक फोटो क्लिक करण्यासाठी सेल्फी घेताना कॅमेऱ्याकडे पाहू नका. त्यामुळे तुमचं एक्सप्रेशन बोअरिंग वाटतं.
वरुन फोटो क्लिक नका करु:
तुम्ही सेल्फी क्लिक करताना कॅमेरा वर पकडला असेल तर ते चुकीचं आहे. सर्वांचा आणि पूर्ण फोटो यावा यासाठी अनेकजण वरुन फोटो क्लिक करतात. मात्र, त्यामुळे अनेकदा फोटो चुकीचा येतो. तुम्ही कॅमेरा आपल्या लेवला ठेवून फोटो क्लिक केला तर तो अधिक चांगला येईल.
ऑटो सेटिंग:
सेल्फी क्लिक करताना प्रयत्न करा की सर्व सेटिंग बायडिफॉल्ट मोडवर आहे. सेल्फी घेताना लाईट आणि इफेक्ट्स तुमचा फोटो खराब करु शकतात. सेल्फी घेताना कॅमेरा बटनला टच करणं खुपच कठीण होतं त्यामुळे कॅमेरा हलतो आणि फोटो ब्लर होण्याची शक्यता असते. सेल्फ टायमरने फोटो हलत नाही आणि चांगला येतो.
फोटो झुम करु नका:
सेल्फी नॉर्मल मोडवर क्लिक करा. सेल्फी क्लिक करताना झुम करु नका. सामान्यत: फोनमध्ये डिजिटल झूम असतो आणि प्रत्येकवेळी झुम केल्यास पिक्चर क्वॉलिटी खराब होत जाते.
साईड पोज:
सेल्फी क्लिक करताना अनेकदा समोरुन फोटो क्लिक करतात. मात्र, तुम्ही साईड पोज देत फोटो क्लिक केला तर ते तुमच्यासाठी चांगलं असेल. म्हणजेच जर फोटो डाव्या किंवा उजव्या बाजूने काढला तर फोटो चांगला येईल.
सेल्फी स्टीक:
सेल्फी क्लिक करताना सेल्फी स्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. एक्सपर्टच्या मते, चांगला सेल्फी घेताना हात आणि सेल्फी स्टिक फोटोत दिसता कामा नये. त्यामुळे फोटोची मजा निघून जाते.
लाईट्स:
सेल्फी क्लिक करताना लाईट चांगली हवी. सेल्फीत प्रकाश हा फोकस सब्जेक्टवर असायला हवा. तसे असल्यास फोटो स्पष्ट आणि चांगला येतो.