नवी दिल्ली : फेसबूक एक असं माध्यम आहे ज्या ठिकाणी लोक एकमेकांसोबत जोडले जातात. तसेच एकमेकांचे अनुभव, फोटोज, व्हिडिओज शेअर करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबूकवर ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला तुमची पोस्ट पहायची नसेल तर तो तुम्हाला अनफ्रेंड करतो, फॉलो करण बंद करतो किंवा ब्लॉक करतो. असाच काहीसा प्रकार मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिस्किला चान यांच्या प्रोफाईलसोबत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना हे करण्यात अपयश आलं.


मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या पत्नीचं प्रोफाईल अनेकदा ब्लॉक करण्यात आलं होतं. त्यानंतर सोशल मीडियातील या दिग्गज कंपनीने हे महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे.


जर तुम्ही या दोघांच्या प्रोफाईलवर ब्लॉकचं बटन प्रेस कराल तर तुम्हाला एक 'ब्लॉक एरर' चा संदेश मिळेल. याचा अर्थ असा होतो की, मार्क झुकरबर्ग आणि प्रिस्किला यांना ब्लॉक करताना अडचण येत आहे. 


खोट्या बातम्या छापणा-यांना नाही मिळणार जाहीराती


फेसबूकने खोट्या बातम्या आणि खोटी माहिती देणा-यां फेसबूक पेजला जाहीरात देण्याचं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खोट्या बातम्यांवर लगाम लावण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.