मुंबई : व्हॉट्सअॅप लवकरच त्यांच्या यूजर्ससाठी सहा नवी फिचर्स घेऊन येणार आहे. ग्रुपमध्ये प्रायव्हेट चॅटिंग, अॅडमिन सेटिंगसारखी ही सहा फिचर्स लवकरच यूजर्सना वापरायला मिळणार आहेत.


१ ग्रुपमध्ये प्रायव्हेट चॅट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटमध्ये यूजर्सना ग्रुपमध्ये प्रायव्हेट चॅट करता येणार आहे. मुख्य म्हणजे ग्रुपवरच तुम्हाला ग्रुपमधल्या सदस्याशी चॅटिंग करता येईल आणि ग्रुपमधल्या इतर मेंबर्सना याबाबत कळणारही नाही.


२ ग्रुप इनव्हाईट लिंक


नव्या अपडेटमध्ये ग्रुप इनव्हाईटसाठी शॉर्टकट बटण देण्यात येणार आहे. याआधी हे शॉर्टकट बटण iOS व्हर्जनवर उपलब्ध होतं. ग्रुप इनव्हाईट लिंकमुळे अॅडमिनच्या परवानगीशिवाय एखाद्याला ग्रुपमध्ये जोडतं येणार आहे.


३ शेक टू रिपोर्ट


या फिचरच्या मदतीनं तुम्ही फक्त फोन हलवून कोणत्याही चॅट किंवा ग्रुपची तक्रार करू शकता. याचबरोबर व्हॉट्सअॅप वापरताना येणाऱ्या समस्येची तक्रारही कंपनीला करता येणार आहे.


४ अॅडमिन सेटिंग्ज


या फिचरमध्ये ग्रुप मेंबर्सपैकी कोणाला ग्रुपवर मेसेज पाठवता येतील याचा अधिकार अॅडमिनला देण्यात आला आहे. म्हणजेच अॅडमिननं सेटिंगमध्ये जाऊन एखाद्या मेंबरला मेसेज पाठवण्यापासून रोखून ठेवलं असेल तर त्या मेंबरनं ग्रुपवर मेसेज करायचा प्रयत्न केला तर तो फक्त अॅडमिनलाच दिसेल. अॅडमिननं त्या मेसेजला परवानगी दिली तरच तो मेसेज ग्रुपमधल्या इतर मेंबर्सना दिसू शकेल.


५ पिक्चर-इन-पिक्चर


या फिचरमुळे तुम्हाला व्हिडिओ चॅटिंगबरोबरच दुसऱ्या मित्राशी मेसेजच्या मार्फत चॅटिंग करता येईल.


६ ग्रुप कॉलिंग


या फिचरमुळे यूजर्सना ग्रुप कॉलिंगही करता येणार आहे. ग्रुप कॉलिंगला सुरुवात केल्यानंतर सगळ्या मेंबर्सना नोटिफिकेशन जाईल. हे नोटिफिकेशन अॅक्सेप्ट केल्यानंतर मेंबर्सना ग्रुप कॉलिंगला सुरुवात करता येईल.