मुंबई : डिजिटल वॉलेट पेमेंट सर्व्हिस व्हॉट्सअ‍ॅप पे भारतात सुरु होत आहे. (Digital wallet payment service WhatsApp Pay) भारत (India) आणि भारतीयांचे (Indians) कौतुक फेसबुचे सीईओ (Facebook  CEO) मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी केले आहे. आम्ही भारतात व्हॉटसअॅप पे लाँच (Whatsapp Payment) केले आणि हे शक्य झाले ते भारतातल्या युपीआय व्यवस्थेमुळे, असे फेसबुचे सीईओ मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच १४० बँकांच्या तप्तरतेमुळे, असे कौतुक झुकेरबर्ग यांनी केले आहे. हे शक्य करून दाखवणारा भारत हा पहिलाच देश आहे. पार्टनरिंग फॉर डिजीटल इंडिया या परिसंवादात ते सहभागी झाले होते. यात रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी देखील उपस्थित होते. 



कोरोनाच्या संकटाने सारे जग गोंधळून गेले आहे. पण संकटातूनच उभारी घेणे हे भारताच्या डीएनएमध्ये असल्याचे उद्योगपती मुकेश अंबानी यावेळी म्हणाले. प्रत्येक संकटातून संधी निर्माण होते आणि अशाच कोव्हिड संकटाला भारताने धीरोदात्तपणे तोंड दिले आहे, असे अंबानी यांनी म्हटले आहे.


फेसबुकच्या मालकीची व्हाट्सअॅप पे ही सेवा सुरु करण्याची घोषणा मार्कने गतवर्षी केली होती. ३०० मिलियन व्हाट्सअॅप वापरकर्त्यांसाठी युपीआय पे सेवा सुरु करण्याचे जाहीर केले होते. ही सेवा आता भारतात सुरु झाला आहे. गेल्या वर्षी देशातील दहा दशलक्ष वापरकर्त्यांसह व्हॉट्सअॅपने आपल्या पेमेंट सेवेची चाचणी सुरू केली होती. जी डिजिटल पेमेंट्स फ्रेमवर्कच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अडकली होती, पण आता ही सेवा अंतिम टप्प्यात आली आणि आता ती सुरु झाली आहे.