नवी दिल्ली : तुम्ही एखादी चांगली कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? मग जास्त वेळ वाया घालवू नका आणि याच महिन्यात कार घ्या. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.


आणखीन पैसे मोजावे लागणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चालू वर्षात कार खरेदी केली नाही तर तुम्हाला आणखीन पैसे खर्च करावे लागतील. कारण, येत्या नव्या वर्षात म्हणजेच जानेवारी महिन्यापासून अनेक कार कंपन्या आपल्या कारच्या किंमतीत वाढ करण्याचा विचार करत आहेत.


एक नजर टाकूयात कुठल्या कार कंपन्या कुठल्या कारच्या किंमतीत किती वाढ करणार आहेत.


या कंपन्या वाढवणार किंमती


टोयाटो किर्लोस्कर मोटर आपल्या कारच्या किंमतीत ३ टक्क्यांनी वाढ करु शकते त्यामुळे या कारच्या किंमतीत ५००० रुपयांपासून ते १ लाख १० हजारापर्यत वाढ होऊ शकते. महिंद्रा अँड महिंद्राच्या गाड्यांच्या किंमतीत ७,००० ते ३०,००० रुपये वाढ होऊ शकते.


स्कोडा ऑटोने २-३ टक्के म्हणजेच १४,००० ते १५,००० रुपये वाढ करण्याचा विचार करत आहे. होंडा कार्स इंडिया आपल्या गाड्यांच्या किंमती जानेवारी २०१८ पासून २५,००० रुपये वाढवण्याच्या तयारीत आहे. इसुजू मोटर्स १५,००० ते १ लाख रुपये वाढ करु शकते. ही कंपनी भारतात पिकअप आणि स्पोर्ट्स युटीलिटी वाहन डी-मॅक्स, डीएमएक्स वी-क्रॉस आणि एमयू-एक्स वाहनांची विक्री करते.


कार कंपन्यांपैकी दिग्गज असलेल्या मारुती सुझुकी आणि ह्युंदाई या दोन कंपन्यांनी सध्या आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करण्याचा कुठलाही विचार नसल्याचं म्हटलं आहे.