नवी दिल्ली : मोबाईलमधील इंटरनेट डेटा संपल्यावर अनेकवेळा नाईलाज होतो. अशावेळा दुसऱ्याकडून हॉटस्पॉट घेण्याशिवाय पर्याय नसतो. आता हेच हॉटस्पॉट फिचर जिओच्या jio phone मध्ये नव्याने देण्यात येणार आहे. जिओफोन आल्यापासून ते आतापर्यंत या फोनमध्ये नवनवीन फिचर्स जोडण्यात येत आहेत. या सुविधेमुळे तुम्हाला दुसऱ्या युजर्सला हॉटस्पाट देता येणार आहे. हा जिओफोन जुलै २०१७ मध्ये लाँच करण्यात आला होता. हा जिओफोन खरेदी करताना दिलेली रक्कम तीन वर्षांनी परत मिळणार असल्याने हा जिओफोन घेण्यासाठी अनेकांनी पसंती दर्शवली होती.      


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉटस्पॉटचे नवे फिचर्स आपल्या जिओफोनमध्ये डाउनलोड करण्यासाठी युजरला सॉफ्टवेअर अपडेट करावे लागणार आहे. कंपनीने हे नवे फिचर्स सॉफ्टवेअरच्या अपडेटच्या माध्यमातून दिले आहे. म्हणजेच जिओफोनमध्ये युजरला एक सॉफ्टवेअर अपडेट करण्यासंदर्भातील सूचना मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर आपोआप हॉटस्पॉटचे फिचर तुमच्या जिओफोनमध्ये डाउनलोड होईल. जर युजरला हे नवे फिचर आपल्या जिओफोनमध्ये डाऊनलोड करण्यास त्रास होत असेल, तर एकदा त्याने सॉफ्टवेअर अपडेट करण्यासंदर्भातील कोणती विनंती आहे का, हे तपासून पाहावे. जर अशा प्रकारची विनंती असल्यास , युजरला ते सॉफ्टवेअर अपडेट करुन घ्यावे लागेल. यानंतरच हॉटस्पॉटचे नवे फिचर युजरला जिओफोनमध्ये दिसेल.


हॉटस्पॉट ऑन


जिओफोनमध्ये हॉटस्पॉट सुरु करण्यासाठी आधी setting अॅप ओपन करावे लागेल. यानंतर network आणि conectivity या पर्यायांमध्ये internet sharing पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला wifi hotspot पर्याय मिळेल. hotspot सुरु केल्यानंतर याचा फायदा घेता येणार आहे. यासोबत तुम्ही कॉम्प्युटर आणि लॅपटॉप देखील जोडू शकता. तसेच युजर आपल्या सोयीनुसार त्याच्या हॉटस्पॉटचे नावदेखील बदलू शकणार आहे.