मुंबई : काही दिवसांपूर्वी चायनीज मोबाईल निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने भारतीय बाजारात स्मार्ट टी.व्ही. लॉन्च केला. त्यानंतर आता फ्रान्सच्या एका कंपनीने स्मार्ट टी.व्ही लॉन्च केला आहे. यावर्षी टोक्नीकलरच्या अधिकार असलेली फ्रेंच कंपनी थॉमसन (Thomson)ने भारतीय बाजारात तीन स्मार्ट टी.व्ही. लॉन्च केले. तिन मॉडल्सला 43 इंचाचा 4 यूएचडी एचडीआर, 40 इंच आणि 32 इंचामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तिन्हीही मॉडल्स नोएडातील एसपीपीएलतर्फे तयार करण्यात आले आहे. या टी.व्ही. चा सेल ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट (Flipkart) वर १३ एप्रिल दुपारी १२ वाजता सुरू होईल. यातील सर्वात स्वस्त स्मार्ट टी.व्ही.ची किंमत 13,490 रुपये आहे. या तिन्ही मॉडल्सचा लूक अतिशय जबरदस्त आहे. हे टी.व्ही. युजर्सच्या पसंतीस पडतील, अशी अपेक्षा आहे.


तिन्ही टी.व्हींचे फिचर्स आणि किंमत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

#1. थॉमसनच्या 43 इंचाच्या टी.व्ही.चे मॉडल 43TM4377 आहे. याची किंमत 27,999 रुपये आहे. कंपनीने यात एलजीचे आयपीएस पॅनल दिले आहे.हा स्मार्ट टी.व्ही. 178 डिग्रीचे व्युईंग अँगल देतो, असा कंपनीचा दावा आहे. हा टी.व्ही. अॅनरॉईड 4.4.4 किटकॅट वर चालतो. यात ड्युल कोर कॉरटेक्स -A53 प्रोसेसर आहे. 1 GB रॅम आणि  8 GB स्टोरेज असलेल्या टी.व्ही.मध्ये हेडफोन जॅक आणि एसडी कार्ड स्लॉटची जागा देण्यात आली आहे. यात वायफाय कनेक्टीव्हीटीची सुविधा आहे.


#2. 40 इंचाचा Thomson smart TV अॅनरॉईड 5.1.1 लॉलीपॉप वर चालतो. कंपनीने यात सॅमसंगचा एलईडी बॅकलिट पॅनल वापरले आहे. यातही 178 डिग्रीचे व्युईंग अँगल असल्याचा कंपनीचा दावा आहे. या स्मार्ट टी.व्ही.त 8 GB इंटरनल स्टोरेज आहे. १० वॉटचे स्पीकर, मल्टीपल पोर्ट, हेडफोन जॅक आणि एसडी कार्ड स्लॉटसाठी जागा आहे. वाय-फाय कनेक्टीव्हीटी असलेल्या या टी.व्ही. ची किंमत  19,990 रुपये आहे.


#3. याचप्रकारे Thomson च्या 32 इंचाच्या स्मार्ट टी.व्ही मध्ये सॅमसंगचा एलईडी बॅकलिट पॅनल देण्यात आले असून हा तिन्ही टी.व्ही. पैकी सर्वात स्वस्त टी.व्ही. आहे. हा अॅनरॉईड 5.1.1 लॉलीपॉप वर चालतो.  मल्टीपल पोर्टसहीत हेडफोन जॅक आणि एसडी कार्ड स्लॉट आणि वाय-फाय कनेक्टीव्हीटीची सुविधा आहे. याची किंमत 13,490 रुपये  आहे.