नवी दिल्ली : भारतात अगदी कमी वेळात लोकप्रिय झालेल्या टिकटॉक चायनीज अॅप कंपनीकडून भारतातील ६० लाखहून अधिक टिकटॉक व्हिडिओ हटवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून आतापर्यंत टिकटॉक अॅपच्या नियमांचे मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आलेले सर्व व्हिडिओ हटवण्यात आले असल्याचे कंपनीने सांगितले आहे. वापरकर्त्यांना टिकटॉकसह सुरक्षित वाटण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. तसेच टिकटॉक अॅपचा वापर करणाऱ्यांना योग्य स्रोत देऊन त्यांना सशक्त करण्याचा प्रयत्न असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टिकटॉक अॅपचा वापर केवळ १३ वर्षांवरील मुलेच करू शकतात. हे एक अतिरिक्त सुरक्षा मानक आहे जेणेकरुन १३ वर्षांखालील मुले या अॅपचा वापर करू शकणार नाहीत. 'जागतिक पातळीवरील टिकटॉकची सुरक्षितता ही प्राथमिकता आहे. यामुळे आम्ही आमच्या भारतातील वापरकर्त्यांसाठी आमचं अॅप सुरक्षित आणि सकारात्मक ठेवण्यासाठी प्रयत्न करणार' असल्याचे टिकटॉकचे संचालक हेलेना लेरच यांनी सांगितले. टिकटॉक सुरक्षा केंद्र चालू करण्यात आल्यानंतर अॅपच्या सुरक्षिततेबाबत कंपनीकडून घोषणा करण्यात आली आहे. तसेच कंपनीने हिंदी, गुजराती, मराठी, बंगाली, पंजाबी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि उडिया यांसारख्या १० भाषांमध्ये मदतीसाठी पेज सुरू करण्यात आले आहेत. 


सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या टिकटॉक मोबाईल व्हिडिओ अॅपवर बंदी घालण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने केंद्र सरकारला दिले आहेत. या अॅपच्या माध्यमातून तरूणाई छोटे म्युजिकल व्हिडिओ तयार करून सोशल मिडियावर पोस्ट करत असतात. या व्हिडिओला स्पेशल इफेक्टही देता येतात. परंतु अनेकदा या अॅपद्वारे अश्लील व्हिडीओही तयार करण्यात येतात. त्यामुळे ‘टिकटॉक’वर बंदी घालावी, अशा प्रकारची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. देशातील संस्कृतीला धोका असल्यानं अॅपवर बंदी घालण्याची मागणी करत याचिका दाखल करण्यात आली होती.  


टिकटॉक चीनमध्ये तयार करण्यात आलेलं अॅप आहे. हे अॅप चीनमध्ये 'डॉयइन' नावाने प्रसिद्ध आहे. सप्टेंबर 2016 साली चीनने ‘डॉयइन’ या अॅपला चीनच्या ऑनलाईन मार्केटमध्ये लाँच केलं होत. त्यानंतर वर्षभरात ‘टिक टॉक’ या नावाने हे अॅप जगभरात लाँच झाले. सध्या भारतात दीड कोटी वापरकर्ते आहेत.