मुंबई : कोणताही उत्सव असो वा कुठे फिरायला गेलेले असोत सेल्फ़ीचा मोह कुणालाच आवरता येत नाही. सेल्फीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. सेल्फीचे शौकीन जगभरात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका रिसर्चनुसार प्रत्येक दिवशी ९३ मिलियन(साधारण ९ कोटी ३० लाख) लोक जगभरात सेल्फी घेतात. सेल्फी घेताना प्रत्येकालाच आपला सेल्फी सर्वात शानदार यावा असं वाटत असतं. त्यासाठीच आम्ही चांगला सेल्फी घेण्यासाठी काही खास टीप्स घेऊन आलो आहोत. 


- कॅमेराकडे बघू नका - एक्सपर्टचं म्हणनं आहे की, एक क्लासिक फोटो घेण्यासाठी तुम्ही कॅमेराकडे बघू नका. यामुळे तुमचं एक्सप्रेशन बोरिंग वाटतं. चेह-याच्या एखाद्या आकर्षक फिचरला फायलाईट करा आणि क्लिक करा. 


- वरून फोटो घेऊ नका - तुम्हीही वरून सेल्फी घेत असाल. पण हे चुकीचं आहे. काही लोक पूर्ण फोटोच्या भानगडीत वरून फोटो क्लिक करतात. पण त्याने फोटो चांगला येत नाही. 


- ऑटो सेटींग - सेल्फी घेताना प्रयत्न करा की, कॅमेराची सर्व सेटींग बायडिफॉल्ट मोडवर ठेवा. सेल्फी घेताना लाईट आणि इफेक्ट तुमचा फोटो बिघडवू शकतो. सोबतच सेल्फी घेताना कॅमेरा बटनला टच करणं कठिण असतं. यामुळे फोटो हलण्याचीही भीती असते. सेल्फ टायमरमुळे फोटो हलणार नाही. 


- फोटो जूम करू नका - सेल्फी नॉर्मल मोडवर क्लिक करा. चांगले होईल की, सेल्फी घेताना झूम करणे टाळा. जनरली फोन डिजिटल झूम होतो आणि प्रत्येकवेळी झूम केल्याने पिक्चर क्वॉलिटी बेकार होते. 


- साइड पोझ - सेल्फी घेताना नेहमी लोक समोरून फोटोग्राफ घेतात. पण जर तुम्ही सेल्फीसाठी पोझ देताना साइड पोझ दिली तर चांगलं होईल. म्हणजे फोटो डावीकडून किंवा उजवीकडून फोटो घेतला तर बरं होईल. 


- हात दिसू नये - सेल्फी घेण्यासाठी आजकाल सेल्फी स्टिकचा प्रयोग होत आहे. एक्सपर्टचं म्हणनं आहे की, चांगल्या सेल्फीमध्ये हात आणि सेल्फी स्टिक दिसू नये. 


- लायटींग - सेल्फी घेताना लायटींग चांगली असावी. प्रकाश सब्जेक्टवर पडावा. सेल्फीमध्ये लायटींगचा फोकस सब्जेक्टवर असावा. याने फोटो अधिक स्पष्ट आणि साफ येते.