Safest Cars In India: देशातील अपघातांचं प्रमाण पाहता सुरक्षित गाड्या घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. अलिकडच्या काळात सुरक्षित कारच्या यादीत लक्षणीय वाढ झाली आहे. जून 2022 पर्यंतच्या टॉप 10 सर्वात सुरक्षित कारच्या यादीत टाटा मोटर्स आणि महिंद्रा या दोन कंपन्यांचे वर्चस्व आहे. 10 पैकी 7 कार या दोन कार उत्पादकांच्या मालकीच्या आहेत.  इतर कार होंडा, टोयोटा आणि फोक्सवॅगनच्या आहेत. टाटा पंच, महिंद्रा XUV300, टाटा अल्ट्रोज, टाटा नेक्सॉन आणि महिंद्रा XUV700 या भारतातील टॉप-10 सुरक्षित कारच्या यादीतील टॉप-5 कार आहेत. त्यांना ग्लोबल एनसीएपी द्वारे क्रॅश चाचण्यांमध्ये 5-स्टार रेट केले आहे. सुरक्षित कारच्या बाबतीत टाटा मोटर्स आणि महिंद्रा पुढे असल्याचे यावरून दिसून येते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यतिरिक्त, टॉप-10 सर्वात सुरक्षित कारच्या यादीतील पुढील पाच गाड्या 4-स्टार रेटिंग असलेल्या आहेत. होंडा जॅझ , टोयोटा अर्बन क्रुझर, महिंद्रा मॅराझ्झो, फॉक्सवॅगन पोलो आणि महिंद्रा थार यांचा समावेश आहे. जर आपण मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित कार पाहिल्या तर, महिंद्रा XUV700 ने  एक नंबरवर आहे. त्यानंतर थार, टाटा पंच, XUV300 आणि टोयोटा अर्बन क्रूझर यांचा क्रमांक लागतो.


रेटिंग


  • टाटा पंच - प्रौढांसाठी 5 स्टार आणि मुलांसाठी 4 स्टार

  • महिंद्रा XUV300 - प्रौढांसाठी 5 स्टार आणि मुलांसाठी 4 स्टार

  • टाटा अल्ट्रोज ​​- प्रौढांसाठी 5 स्टार आणि मुलांसाठी 3 स्टार

  • टाटा नेक्सॉन - प्रौढांसाठी 5 स्टार आणि मुलांसाठी 3 स्टार

  • महिंद्रा XUV700 - प्रौढांसाठी 5 स्टार आणि मुलांसाठी 4 स्टार

  • होंडा जॅझ - प्रौढांसाठी 4 स्टार आणि मुलांसाठी 3 स्टार

  • टोयोटा अर्बन क्रूझर - प्रौढांसाठी 4 स्टार आणि मुलांसाठी 3 स्टार

  • महिंद्रा मराझो - प्रौढांसाठी 4 स्टार आणि मुलांसाठी 2 स्टार

  • फोक्सवॅगन पोलो - प्रौढांसाठी 4 स्टार आणि मुलांसाठी 3 स्टार

  • महिंद्रा थार - प्रौढांसाठी 4 स्टार आणि मुलांसाठी 4 स्टार