मुंबई : टोरेटो कंपनीने जेस्ट प्रो व्हायरलेस चार्जर पॉवर बॅंक लॉन्च केली. म्हणजे आता चार्जिंग करण्यासाठी वायरची गरज भासणार नाही. फोन चार्ज करण्याचे कामही यामुळे वायरलेस होईल.

कॅरी करणे सोपे


जेस्ट प्रो वायरलेस चार्जरमध्ये १०००० एमएएचचं लिथियम पॉलिमर बॅटरी आहे. ही पावरबॅँक अल्ट्रापोर्टेबल आणि कमी वजनाची (लाईटवेट) असल्यामुळे तुम्ही ही बॅटरी सहज कॅरी करु शकता. अगदी खिशातही ठेऊ शकता.

ही आहे किंमत


स्लिक लूकची ही पावरबॅँक दिसायला स्टायलिश आहे. १०००० एमएएच ची बॅटरी, २ युएसबी आणि अल्ट्रा स्लिम डिझाईन ही पॉवरबॅंकेची खासियत आहे. जेस्ट प्रो आणि जेस्ट अशा दोन पॉवरबॅंक आहेत. रॉयल ब्लॅक आणि क्लासी व्हाईट या दोन रंगामध्ये ही पॉवरबॅंक उपलब्ध आहे. यांची किंमत अनुक्रमे २९९९ आणि २०९९ आहे.