Toyota Innova Crysta: टोयोटा मोटर लवकरच इनोव्हा क्रिस्टा MPV ला नवं डिझाईन, फिचर्स आणि नव्या इंजिनसह पुन्हा एकदा लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने इनोव्हा क्रिस्टाचं बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. नव्या लूकमधील इनोव्हाला 50 हजारांचं टोकन देत बूक करु शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोयोटा मोटरने आतापर्यंत इनोव्हा क्रिस्टा 2023 मॉडेली किंमत जाहीर केलेली नाही. पुढील महिन्यात ही कार अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वी इनोव्हाचं डिझेल इंजिन बंद करुन एका हायब्रिड इंजिनसह लाँच केलं होतं. आता कंपनी पुन्हा एकदा डिझेल इंजिन आणण्याच्या तयारीत आहे. 


फॉर्च्यूनरप्रमाणे असणार डिझाइन


नव्या अवतारात येणाऱ्या इनोव्हा क्रिस्टाच्या डिझाइनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. कारचा फ्रंट लूक बदलण्यात आला आहे. तसंच जुन्या इनोव्हा क्रिस्टाच्या तुलनेत जास्त भक्कम असेल. या फॅमिली कारचा नवा लूक एसयुव्ही फॉर्च्यूनरच्या फ्रंट लूकप्रमाणे आहे. 


नवी इनोव्हा क्रिस्टा G, GX, VX आणि ZX नावाच्या 4 मॉडलमध्ये उपलब्ध असेल. कारची क्षमता सात ते आठ प्रवाशांची अशेल. तसंच पाच रंगांचे पर्याय उपलब्ध असतील. ज्यामध्ये व्हाइट पर्ल क्रिस्टल शाइन, सुपर व्हाइट, सिल्व्हर, एटिट्यूड ब्लॅक आणि अवंत गार्डे ब्रॉन्ज हे रंग असतील. 


पहिल्यापेक्षा जास्त लक्झरी असणार इनोव्हा


नव्या इनोव्हा क्रिस्टाच्या फिचर्सबद्दल बोलायचं गेल्यास, यामध्ये 8 इंचाचा Touch Screen Display असेल, जो Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करतो. याशिवाय कारमध्ये TFT ड्राइवर डिस्प्ले, वन टच टम्बल सेकंड रो सीट्स, डिजिटल डिस्प्लेसह रियर ऑटो AC, 8-वे पावर एडजस्टेबल ड्राइवर सीट, स्मार्ट एंट्री सिस्टम, सीट बॅक टेबल और एम्बिएंट लाइटिंग असणार आहे. 


पहिल्यापेक्षा अधिक पॉवरफूल इंजिन


टोयोटाच्या नव्या इनोव्हा क्रिस्टामध्ये अॅडव्हान्स सेफ्टी फिचर्स मिळणार आहेत. यामध्ये सुरक्षेसाठी 7 एअरबॅग, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर, व्हीकल स्टेबिलिटी कंट्रोल आणि हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल, एबीएस, ईबीडी आणि ब्रेक असिस्ट (बीए), 3-पॉइंट सीट बेल्ट आणि हेडरेस्टसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. 


नवी टोयोटा इनोव्हा क्रिस्टाच्या चारही व्हेरियंटमध्ये फक्त 2.4 लीटर डिझेल इंजिन दिलं जाणार आहे. गतवर्षी लाँच झालेल्या इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड मॉडेलसह देण्यात आलेल्या 2.0 लीटर पेट्रोल इंजिनपेक्षा जास्त पॉवरफूल असेल.