टोयोटाची इलेक्ट्रिक कार लाँच, पाहा भारतात कधी?
टोयोटाने आपली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. मात्र, ही कार भारतात लाँच करण्यात आलेली नाही. भारतात २०१० पर्यंत ही कार लाँच करण्याचा मानस कंपनीचा आहे.
मुंबई : टोयोटाने आपली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. मात्र, ही कार भारतात लाँच करण्यात आलेली नाही. भारतात २०१० पर्यंत ही कार लाँच करण्याचा मानस कंपनीचा आहे.
कंपनी २०२० पर्यंत १० इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत आहे. या कार भारत, चीन, जपान, अमेरिका आणि युरोपात लाँच करण्यात येणार आहेत.
या इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करण्याआधी चीनमध्ये लाँच करण्यात येतील. कारण की, चीन जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनींची बाजारपेठ आहे, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
टोयोटा कंपनी सुरुवातीला भारतात लहान इलेक्ट्रकि कार लाँच करण्याची शक्यता आहे. ही कार मारुती सुझुकीच्या गुजरातमधील प्लांटमध्ये तयार करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. कारण की, भारतात इलेक्ट्रॉनिक कार तयार करण्यासाठी मारुती सुझुकी आणि टोयोटाने नुकताच एक करार केलाय.