टोयोटाने लॉन्च केली जबरदस्त फिचर्स असलेली Yaris, किंमत...
आघाडीची कार निर्माता कंपनी (Toyota)ने आपली नवी सेडान कार यारिस (Yaris) भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. या कारसाठी काही दिवसांपूर्वीच बुकिंग सुरु करण्यात आली होती.
मुंबई : आघाडीची कार निर्माता कंपनी (Toyota)ने आपली नवी सेडान कार यारिस (Yaris) भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. या कारसाठी काही दिवसांपूर्वीच बुकिंग सुरु करण्यात आली होती.
टोयोटा कंपनीने आपली ही नवी सेडान कार याच वर्षी झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये सादर केली होती. तेव्हापासून या कारने कार प्रेमींची मनं जिंकली होती. ही कार पाहिल्यापासून लॉन्च कधी होणार याची वाट कार युजर्स करत होते. अखेर कंपनीने ही कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.
टोयोटा यारिस या कारला कोरोलाचं लहान अवतार असल्याचं बोललं जात आहे. या कारची टक्कर भारतीय बाजारात असलेल्या होंडा सिटी, मारुतीची सियाज, स्कोडा रॅपिड, ह्युंदाई वर्ना आणि फोक्सवॅगनची वेंटा यांच्यासोबत आहे. टोयोटाची नवी कार चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मॅन्युअल आणि सीवीटी गिअरबॉक्स या दोन्ही व्हेरिएंटचा समावेश आहे.
इंजिन
यारिस कारमध्ये 1.5 लिटरचं पेट्रोल इंजिन आहे जे 108 bhp पॉवर जनरेट करतं. सध्या कंपनीने ही कार डिझेल व्हेरिएंटमध्ये लॉन्च केलेली नाहीये. मात्र, येत्या काळात लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कारची किंमत
टोयाटो यारिस या कारची सुरुवाती एक्स शोरुम किंमत 8.75 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर, या कारचं टॉप वेरिएंट 14.07 लाख रुपये आहे. टोयोटा यारिस J चं एमटी ट्रान्समिशन 8.75 लाख रुपये आणि सीव्हीटी 9.95 लाख रुपये आहे. याच प्रमाणे यारिस G चं एमटी ट्रान्समिशन 10.56 लाखात आणि सीव्हीसी 11.76 लाखांत उपलब्ध आहे. V व्हेरिएंटचं एमटी ट्रान्समिशन 11.7 लाख रुपयांत आणि याचं सीव्हीटी मॉडल 12.9 लाख रुपयांत उपलब्ध आहे. तर कारचं VX व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी 12.85 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.
मायलेज
टोयोटा यारिसचं मॅन्युअल ट्रान्समिशन असलेलं मॉडेल 17.1 किमी प्रति लिटर आणि सीव्हीटी मॉडेल 17.8 किमी प्रति लिटरचा मायलेज देते.
फिचर्स
टोयोटाने या कारमध्ये 7 एअरबॅग्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, सर्व टायर्सला डिस्क ब्रेक, एसी वेंट्स आणि एलईडी हायलाईट्स सोबतच स्टेबिलिटी कंट्रोल, ऑटो प्रोजेक्टर, रियर कॅमेरा, टचस्क्रिन, नेविगेशन सारखे अनेक फिचर्स दिले आहेत.