मुंबई : रेल्वेचं लाइव स्टेटस आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून देखील जाणून घेऊ शकता. ऑनलाइन ट्रवल वेबसाइट 'मेक माय ट्रिप' च्या मदतीतून रेल्वे प्रवाशांसाठी ही सुविधा सुरू केली आहे. तसेच व्हॉट्सअॅपच्या मदतीने तुम्ही पीएनआरची स्थिती देखील जाणून घेऊ शकता. आतापर्यंत सर्व रेल्वे प्रवाशी लाइव रनिंग स्टेटस आणि पीएनआर स्टेटस करता रेल्वेच्या 139 या टोलनंबरवर फोन करून माहिती जाणून घेतली पाहिजे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयआरसीटीसीची माहिती देखील तुम्हाला यामधून मिळू शकते. यामुळे प्रवाशांना अनेकदा समस्यांना सामोरे जावं लागतं. आयटी कंपनी आणि रेल्वे मंत्री यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. नवीन स्मार्ट फोनवर व्हॉट्सअॅपवरून पीएनआर आणि ट्रेनचं लाइव स्टेटस पाहण्यासाठी 'मेक आय ट्रिप'च्या ऑफिशिअल व्हॉट्सअप नंबर 7349389104 ला तुमच्या मोबाइलमध्ये सेव करा. याकरता तुमच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअॅपचा लेटेस्ट वर्जन इंस्टॉल असणं गरजेचं आहे. 


नंबर सेव केल्यावर व्हॉट्सअॅपमध्ये हा नंबर सर्च करा. कॉन्टेक्टवर टॅप करून तुम्ही चॅट विंडोमध्ये ट्रेनचं लाइव स्टेटस चेक करण्यासाठी ट्रेनचा नंबर टाइप करा. पीएनआर स्टेटस चेक करण्यासाठी पीएनआर नंबर पाठवा. अशा पद्धतीने तुम्हाला पीएनआर आणि लाइव स्टेटस दिसू शकतं