5G Launch and Price - इंटरनेचा वेग लवकरच सुस्स्साट होणार आहे. 5G नेटवर्कची प्रतिक्षा करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. 5G स्पेक्ट्रमसाठी लिलाव पूर्ण झाला आहे. या लिलावात रिलायान्स जिओने बाजी मारली आहे. जिओने सर्वाधिक 88,078 कोटींनी हा लिलाव जिंकला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील हे सर्वात महत्त्वाचे पाऊल मानले जातं आहे. आता 5G नेटवर्कची स्पीड(Speed)कशी असेल? ते कधी सुरु होणार आणि या सर्विससाठी किती पैसे माजावे लागणार, अशा प्रश्न तुम्हाला पडले असतील. (trending news 5g speed and expected new price know the all details of services in marathi)



5G सिमची गरज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

5G चा वापर करण्यासाठी 5जी स्मार्टफोन (5G Smartphone) आणि 5G सिम असणे गरजेचे आहे. 5G हे भारतातील सर्वात वेगवान मोबाईल नेटवर्क असणार आहे. या नेटवर्कमुळे आपल्याला इंटरनेटवर हवी असणारी माहिती काही सेकंदात मिळणार आहे. सध्या देशात 4G नेटवर्क आहे. 5G नेटवर्क आल्यानंतर तुम्ही एखाद्या व्हिडीओ सुपरफास्ट डाउनलोड करु शकतो. 5Gमुळे टेलीमेडिसिन, मायनिंग, वेयरहाउसिंग आणि मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी तेजी पाहिला मिळणार आहे. 


5G स्पीड किती असणार?


5G नेटवर्कमुळे आपलं काम सोपं होणार आहे. कारण आता आपल्याला 40 पटीने जास्त स्पीड मिळणार आहे. या नेटवर्कमुळे 20 gbps डाऊनलिंक आणि 10 gbps अपलिंकने करता येणार आहे. 



कधी सुरु होणार सर्विस?


ही सर्विस आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होण्याचा दावा टेलीकॉम मंत्री अश्वनी वैष्णव यांनी केला आहे. तर जिओचा 15 ऑगस्टला 5G सेवा लाँच करण्याचा विचार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ही सेवा 13 शहरांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 


कुठल्या शहरांमध्ये मिळणार सेवा?


1. मुंबई
2. अहमदाबाद
3. हैदराबाद
4. बंगुळुरू
5. पुणे 
6. चेन्नई
7. कोलकता
8. लखनऊ
9. गांधीनगर
10. गुरूग्राम
11. चंदीगढ
12. जामनगर
13. दिल्ली


अंदाजित किंमती काय असेल?


रिलायन्स जिओने 5G स्पेक्ट्रमसाठी ज्याप्रकारे पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. ते पाहता या क्षेत्रातील तज्ञ्जांच्यामध्ये 5G हा 4-10 टक्क्यांनी महाग असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ 4G पेक्षा 5G सेवा खूप जास्त महाग असणार आहे. पण दूरसंचार मंत्री यांनी म्हटलं आहे की, ''भारतात हे टेलिकाम सेवेतील सर्वात स्वस्त सेवा पूरवतं.'' त्यामुळे अशा परिस्थितीत 5G सेवे फार महाग नसेल अशी ग्राहकांची अपेक्षा आहे.