Free Internet : मोबाईल डेटा संपला असेल, तर असं मिळवा फ्री इंटरनेट
आता टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमचा डेटा संपला तर, तो फ्रीमध्ये कसा मिळवायचा? हे जाणून घ्या.
मुंबई : आजच्या काळात इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे. ज्यामुळे आपल्याला काहीही करायचं झालं तर, त्यासाठी इंटरनेट हा लागतोच. इंटरनेटशिवाय मोबाईल इंटरनेट, म्हणजे अगदी आत्माशिवाय माणूस असंच म्हणावं लागेल. त्यामुळे फोनमधील इंटरनेट संपला तर तो मोबाईल फारसा काही कामाचा उरत नाही. ज्यामुळे प्रत्येकाला फोन वापरण्यासाठी इंटरनेट रिजार्ज पॅक मारावा लागतो. ज्यामुळे मोबाईल वापरणे सहज शक्य होतं.
परंतु सामान्यतः प्रत्येकाकडे मर्यादित मोबाइल डेटा असतो. त्यामुळे जर हा डेटा संपला तर, त्या युजरला विना इंटरनेट उरलेला दिवस काढावा लागतो. तुमच्यासोबत देखील असं बऱ्याचदा घडलं असेल.
पण आता टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमचा डेटा संपला तर, तो फ्रीमध्ये कसा मिळवायचा? याबद्दल एक ट्रीक सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा फोन कुठेही फ्री वायफायशी कनेक्ट करू शकता आणि इंटरनेट वापरू शकता. पण हे कसं शक्य आहे? ते जाणून घेऊ.
अशा प्रकारे तुम्हाला Facebook वरून मोफत वायफाय मिळेल.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक युजर्सला मोफत वायफाय देते आहे. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील आणि त्यानंतर मोफत इंटरनेट तुमच्यापर्यंत कोणत्याही त्रासाशिवाय पोहोचेल.
फेसबुक सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉटचे तपशील प्रदान करते, ज्याद्वारे तुम्ही विनामूल्य इंटरनेट मिळवू शकता. हे करण्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही अॅपची आवश्यकता नाही आणि हे फीचर Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
काय करावं? जाणून घ्या
फेसबुकद्वारे मोफत इंटरनेट मिळवण्यासाठी, प्रथम तुमच्या फोनवर फेसबुकचे अधिकृत अॅप उघडा, येथे तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला असलेल्या मेनूवर क्लिक करावे लागेल आणि नंतर 'सेटिंग्ज आणि गोपनीयता' या पर्यायावर जावे लागेल.
येथे तुम्हाला 'फाइंड वायफाय' या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर फेसबुक तुम्हाला जवळपासच्या सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉटची माहिती देईल.
येथे तुम्हाला ठिकाणाचे नाव आणि नकाशा दोन्हीमध्ये माहिती मिळेल.
तुम्हाला हॉटस्पॉट दिसत नसल्यास, तुम्ही 'पुन्हा शोधा' वर क्लिक करू शकता.
त्यानंतर 'सी मोअर' वर क्लिक करून तुम्ही पर्याय शोधू शकता. येथे तुम्हाला सशुल्क आणि मोफत हॉटस्पॉट असे दोन्ही पर्याय मिळतील.
अशा प्रकारे, तुम्ही कुठेही बसून तुमच्या Facebook अॅपद्वारे मोफत वायफाय मिळवण्याचा आनंद घेऊ शकाल.