COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मोबाईलवर येणारा अज्ञात कॉल कोणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी अनेकजण 'ट्रू कॉलर' या अॅपचा वापर करत आहेत. मोठ्या प्रमाणात या अॅपचा वापरण्यात  करण्यात येत आहे. पण या अॅपच्या माध्यमातून नागरिकांची वैयक्तिक माहिती कंपन्यांना पुरवली जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे देशातील कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन होत आहे, असा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आलीये.


ट्रू कॉलर अॅपच्या माध्यमातून सर्व वापरकर्त्यांची माहिती गोळा केली जाते आणि ती त्यांच्या भागीदारांना पुरवली जाते, असे करताना वापरकर्त्यांची कोणतीही  पूर्वपरवानगी घेतली जात नाही. तसेच हे अॅप वापरकर्त्यांच्या संमतीविना किंवा योग्य प्रक्रियेविनाच त्यांची युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस सेवेसाठी नोंदणीही करते.


मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने या याचिकेची दखल घेत केंद्र आणि राज्य सरकार तसेच ट्रू कॉलर इंटरनॅशनल एलएलपी,  आयसीआयसीआय बॅक आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन या प्रतिवादींना नोटीस जारी केली आहे. आणि 3 आठवड्यात  प्रतिज्ञापत्रावर म्हणणे मांडण्याची मुभा दिली  आहे.


अखेरीस नागरिकांच्या डेटा सुरक्षिततेच्या कायद्यांचे उल्लंघन करत अॅप सुरु असल्याचे याचिकादारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढील सुनावणी तीन  आठवड्यांनी ठेवण्यात आली आहे. या सगळ्या गोष्टींना चाप लावण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.