मुंबई  : टीव्हीएसने बाजारात नुकतेच बाईकचे नवे मॉडल लॉन्च केले आहे. बाईक अपाचेचे नवे मॉडेल TVS Apache RR 310S लॉन्च केले आहे. टीव्हीएस ही दुचाकी गाड्या बनवणारी लोकप्रिय कंपनी आहे. त्यामुळे कंपनीला या मॉडेकडून बर्‍याच अपेक्षा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्यतः गाडी लॉन्च झाल्यानंतर लगेजच बाईकची किंमत कमी होत नाही. मात्र ही बाईक त्याला अपावाद आहे. एक्स शोरूम किंमतीवर सुमारे 20,000 रूपयांचे डिस्काऊंट देण्यात आले आहे.  


बाईकची किंमत किती  ?  


काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या या बाईकची किंमत 2.15 लाख रूपये आहे. केरळमध्ये ही बाईक 2 लाखात उपलब्ध होती. तर तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश  येथे या बाईकची एक्स शो रूम किंमत 2.05 लाख रूपये होती अशी माहिती एका वेबसाईटने दिलेल्या माहितीमध्ये आहे. 


का कमी केली किंमत ? 


केरळमध्ये 2लाखाहून अधिक किंमतीच्या बाईकवर 20% रोड टॅक्स आकारला जातो. हा टॅक्स वाचवण्यासाठी बाईकची किंमत कमी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. केरळमध्ये KTM RC 390 या बाईकला TVS Apache RR 310S आव्हान देणार आहे. 


KTM RC 390 ची किंमत किती  ? 


केरळमध्ये बाईक घेणार असाल तर तुम्हांला 20 हजारांचा फायदा होऊ शकतो.
KTM RC 390 ची किंमत कमी होणार का ? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तर TVS Apache RR 310S  ही टीव्हीएस मोटर्सची फ्लॅगशिप  मोटारसायकल आहे. राईडिंग सोबतच रेसिंग ट्रॅकसाठीही ही फायदेशीर आहे. 


या बाईकमध्ये 310 सीसी इंजन आहे. यामध्ये 6 मॅन्युएल गिअरबॉक्स  सोबत पेटल डिसक ब्रेक, स्टॅडर्ड फीचरमध्ये यात अ‍ॅन्टी लॉकिंग ब्रेकिंग सिस्टीम आहे.