मुंबई : देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने आपल्या दुचाकींच्या किमतीत बदल केले आहेत. कंपनीने आपल्या काही वाहनांच्या किमतीत कपात केली आहे तर बाईक रेंजच्या किंमतीत वाढ केली आहे.कंपनीने औपचारिक पद्धतीने किमतींची घोषणा केलेली नाहीये मात्र, कंपनीने आपल्या वेबसाईटवर नव्या किमती अपडेट केल्या आहेत.


नव्या किमती लागू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाड्यांच्या किमतीत झालेली वाढ नव्या वित्त वर्षापासून लागू करण्यात आल्या आहेत. कंपनीने आपल्या काही प्रोडक्ट्सच्या किमतीत कुठलाही बदल केलेला नाहीये. यामध्ये टीव्हीएस ज्युपिटर, विक्टर 110, स्कूटी पेप+ आणि स्कूटी सारख्या वाहनांचा समावेश आहे.


पाहा काय आहेत नव्या किमती


प्रमुख बदलांवर एक नजर टाकली तर कंपनीने आपली लोकप्रिय स्कूटर वीगो 110 च्या किमतीत 2,000 रुपयांनी कपात केली आहे. किमतीमध्ये कपात केल्यानंतर वीगो 110च्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 50,165 रुपये (एक्स शोरुम दिल्ली) झाली आहे. तर, टीव्हीएस वीगोच्या डिस्क ब्रेक मॉडची किंमत 53,083 रुपये (एक्स शोरुम दिल्ली) झाली आहे. आतापर्यंत टीव्हीएस वीगोची किंमत 55,083 रुपये होती.


स्कूटर झाली स्वस्त तर बाईक महाग


कंपनीने एकीकडे स्कूटरच्या किमतीत कपात केली आहे तर बाईकच्या किमतीत वाढ केली आहे. टीव्हीएसची प्रसिद्ध बाईक स्पोर्ट 110 मोटरसायकलच्या किमतीत कंपनीने 850 रुपयांनी किरकोळ वाढ केली आहे. ही बाईक आतापर्यंत 39,363 रुपये (एक्स शोरुम दिल्ली) मध्ये उपलब्ध आहे. आतापर्यंत या गाडीची किंमत 38,513 रुपये होती. यासोबतच टीव्हीएसने आपल्या प्रसिद्ध आपाचे रेन्जच्या सर्व बाईक्सच्या किमतीतही वाढ केल्याची घोषणा केली आहे.


अपाचे रेंजच्या किंमतीत 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या रेंजमध्ये कंपनीची आपाचे आरटीआर 200 4व्ही, आरटीआर 160 4व्ही एफआय, आरटीआर 160 आणि आरटीआर 180 यांचा समावेश आहे.


नुकतीच लॉन्च करण्यात आलेली TVS ची नवी आपाचे आरआर 310 च्या किमतीत काही दिवसांपूर्वीच वाढ करण्यात आली आहे. आता या बाईकसाठी तुम्हाला 8,000 रुपयांहून अधिक खर्च करावे लागणार आहेत. कारण, कंपनीने बाईकच्या दिल्लीतील एक्सशोरुममधील किंमत 2.23 लाख ठेवण्यात आली आहे.