नवी दिल्ली : टीव्हीएस मोटार कंपनीने भारतात ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी टेक्नॉलॉजी असलेली आपली पहिली स्कूटर लॉन्च केली आहे. NTORQ 125सीसी ही स्कूटर लॉन्च करण्यात आलीये. चला जाणून घेऊया स्कूटरची खासियत.


ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी असलेली पहिली स्कूटर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कनेक्टिव्हीटीसाठी ब्लूटूथ आणि नॅव्हिगेशनसारखे फिचर्स या देण्यात आलेली ही भारतातील पहिलीच स्कूटर आहे. या स्कूटरला ब्लूटूथच्या माध्यमातून फोनला कनेक्ट करता येतं. 


इंजिन


या नव्या स्कूटरमध्ये CVTi-REVV या नव्या तंत्रज्ञानाचं १२४.८ सीसी सिंगल सिलेंडर, ४ स्ट्रोक, ३ व्हॉल्व, एअर कूल्ड SOHC इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन ९.४ बीएचपीची पावर आणि १०.५ एनएमचं टॉर्क जनरेट करतं.


टॉप स्पीड


कंपनीने दावा केलाय की, या स्कूटरची टॉप स्पीड ९५ किलोमीटर प्रति तासाची आहे. ज्यासाठी TVS रेसिंग पॅडिग्री तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. 


इतर फिचर्स


या नव्या स्कूटरमध्ये संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसोबत अनेक अ‍ॅडव्हांस आणि हायटेक फिचर्स देण्यात आले आहेत. यात नॅव्हिगेशन असिस्ट, टॉप स्पीड रेकॉर्डर, इन-बिल्ट लॅप-टायमर, सर्व्हिस रिमायन्डर, ट्रिप मीटर, इंजिन ऑईल तापमानासोबत मल्टी-राईड स्टॅटेस्टीक मोड्सचा समावेश आहे. यासोबतच एनटॉर्क १२५ मध्ये स्टायलिश हेडलाईटसोबत एलईडी टेललॅम्प आणि डायमंड कट अलॉय व्हील्सचा समावेश आहे. 


किती आहे किंमत?


ही धमाकेदार स्कूटर चार रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. यात मॅट येलो, मॅट ग्रीन, मॅट रेड आणि मॅट व्हाईट या रंगांचा समावेश आहे. या स्कूटरची किंमत दिल्ली एक्स शोरूमध्ये ५८ हजार ७५० रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. कंपनीने पुढील १२ महिन्यात या स्कूटरचे २ लाख यूनिट्स विकण्याची योजना तयार केली आहे.