मुंबई : TVS कंपनीची अपाचे RR 310 ही बाईक लॉन्च झाली आहे. यासोबतच TVSनं सुपरबाईक सेगमेंटमध्ये जोरदार एन्ट्री घेतली आहे. या बाईकची दिल्ली एक्स शोरूम किंमत 2.05 लाख एवढी आहे. या बाईकला TVS आणि BMW मोटरेडनं तयार केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

TVSच्या या बाईकचा लूक BMW G310 R सोबत मिळते जुळते आहेत. TVSच्या या बाईकच्या बुकिंगला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. जानेवारी महिन्यापासून या बाईकची डिलिव्हरी मिळायला सुरुवात होईल.



TVS अपाचे RR 310 चा टॉप स्पीड 160 किलोमिटर प्रती तास एवढा आहे. पहिल्याच वर्षी 10 हजार बाईक विकल्या जातील, असा अंदाज कंपनीनं व्यक्त केला आहे.


TVS अपाचे RR 310ची टक्कर कावासाकी निनजा 300 सोबत असणार आहे. कावासाकी निनजा भारतामध्ये सध्याची सगळ्यात लोकप्रिय सुपरबाईक आहे. या दोन्ही बाईकची किंमतही जवळपास सारखीच आहे.



TVS अपाचे RR 310ची फिचर्स


312CC सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक लिक्विड कूल्ड इंजिन


6 गियरबॉक्स


160 किलोमिटर प्रतीतासाचा स्पीड


2.9 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतीतासाचा स्पीड


कायाबा फ्रंट फॉर्क


रियर मोनोशॉक


ब्रेकसाठी 300 एमएम पेटल डिस्क


240 एमएम रियर डिस्क, ड्युअल चॅनल एबीएस


डिजीटल कंसोल


लॅप टायमर


एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी टेल लाईट्स


इंडिकेटरला एलईडी लाईट, रात्री इंडिकेटर आणखी आकर्षक दिसणार