मुंबई : पेट्रोलचे वाढते भाव ही आता देशाची समस्या बनत चालली आहे. अशावेळी विना पेट्रोल गाडी चालली तर ? असा प्रश्न विचारला जातोय. पण हे प्रत्यक्षातदेखील शक्य आहे. गुरुग्राममधल्या टेंट्वी टू मोटर्स ऑटो एक्स्पो यावर्षी फ्लो इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार आहे. या स्कूटरला गियर असणार आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये २.१ किलोवॅटची एक इलेक्ट्रिक मोटार देण्यात आली आहे. Twenty Two Motors या स्कूटरद्वारे भारतीय बाजारात एन्ट्री करत आहे. याचे वजन ८५ कि.ग्रॅ असून यावर १५० कि.ग्रॅ वाहतूक करता येणार आहे. ही स्कूटर संपूर्ण चार्ज केल्यावर तुम्ही ८० कि.मी पर्यंतचा प्रवास करु शकता. ६० किमी प्रति तास वेगाने तुम्ही ही स्कूटर चालवू शकता.  क्रूझ कंट्रोल, कायनेटीक एनर्जी रिकवरी सिस्टिम, एलसीडी डिस्प्ले आणि हायटेक फिचर्स देण्यात आले आहेत.


मोबाईलशी कनेक्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्कूटरला मोबाईल अॅपशीदेखील जोडण्यात आलंय. त्यामुळे स्कूटर ट्रॅक करण्यासोबतच यात झालेला बिघाडही तुम्हाला कळू शकणार आहे. यामध्ये असलेल्या जियो फेसिंग टेक्निकद्वारे तुम्ही एका मर्यादित अंतरावर चालण्याचा प्रोग्राम बनवू शकता. यासोबतच टेलिस्कोपिक सस्पेंशन, डिस्क ब्रेक्ससहित मोबाइल चार्जिंग सॉकिट आणि सीटच्या मागे २ हेल्मेट राहण्याइतकी जागा असेल. 


किंमत 


या स्कूटरची किंमत ६० हजार रुपयांपासून पुढे असेल.