Twitter युजर्ससाठी मोठी बातमी, एलन मस्कची पुन्हा नवी घोषणा!
Twitter Blue Tick : एलन मस्कने ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन संदर्भात नवी घोषणा केली आहे. अमेरिकेतील अनेक बनावट ट्विटर खात्यांनी पैसे भरून ब्लू टिक गेतले होते. यामुळे त्रासलेल्या ट्विटरने आपल्या ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवेवर बंदी घातली होती.
Twitter Blue Tick Subscription : ट्विटरचा मालकी हक्क एलोन मस्क (Elon Musk) यांच्याकडे आल्यापासून रोज काहींना काही घडामोडी घडत आहेत. कर्मचारी कपातीपासून ते ट्विटरमध्ये नवे बदल केले जात आहेत. आता तर बनावट खात्यांमुळे स्थगित करण्यात आलेली ‘ट्विटर ब्लू’ (Twitter Blue tick ) सेवा येत्या 29 नोव्हेंबरला पुन्हा लॉन्च करण्यात येणार होती. मात्र, आता या सेवेसाठी युजर्संना महिना अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. काही युजर्सने या सेवेचा गैरवापर केल्यानं ही सेवा मागे घेण्याची नामुष्की ट्विटरवर ओढवली आहे.
तसेच या सेवेसाठी पैसे न भरणाऱ्या युजर्सचे ‘ब्लू टिक’ (Twitter Blue tick ) काही महिन्यांमध्ये काढून घेतले जातील, असे एलॉन मस्क (Elon Musk) यांनी एका युजरच्या ट्वीटला उत्तर देताना म्हटलं आहे. त्यामुळे ज्या युजर्सकडे सबस्क्रिप्शन सेवेच्या आधीपासून ‘ब्लू टिक’ आहे, त्यांनाही येत्या काळात पैसे भरावे लागणार आहे. व्हेरिफाईड खात्याचं नाव बदलताना ‘ब्लू टिक’ गमवावी लागू शकते, असेही मस्क यांनी म्हटले आहे. ट्विटरच्या नियमांनुसार नावाची पुष्टी केल्यानंतरच हे नाव बदलता येईल, असंही त्यांनी सांगितले आहे. ट्विटरकडून ‘ब्लू टिक’ पूर्वी राजकारणी, पत्रकार, प्रसिद्ध व्यक्तींच्या व्हेरिफाईड खात्यांना दिली जात होती. मात्र, आता यासाठी सबस्क्रिप्शन सेवा सुरू केल्यानंतर ही टिक कोणालाही वापरता येणं सहज शक्य आहे.
वैयक्तिक आणि कंपनी खात्यांसाठी स्वतंत्र टिक
मस्क यांनी सोमवारी सांगितले की, कंपनी वैयक्तिक खात्यांपेक्षा संस्था आणि कंपन्यांसाठी वेगवेगळ्या रंगीत टिक्स वापरू शकते. कंपनी त्यावर काम करत आहे. लवकरच या संदर्भात अधिक माहिती दिली जाणार आहे.
अधिग्रहणानंतरची ही पहिलीच घोषणा
मस्कने ट्विटर घेताच पहिली मोठी घोषणा केली ती म्हणजे सशुल्क ब्लू टिक सबस्क्रिप्शनची (Blue Tick Subscription). परंतु पहिल्या दोन दिवसात लोकांनी या सेवेचा गैरवापर केला. त्यामुळे अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे कोट्यवधी रुपये बुडाले. यानंतर कंपनीने सशुल्क वर्गणी बंद केली होती. काही सुरक्षा आणि गोपनीयता धोरणे मजबूत करून 29 नोव्हेंबरला ते पुन्हा लॉन्च केले जाईल असे कंपनीने सांगितले होते. 29 नोव्हेंबरची तारीख खुद्द एलोन मस्क यांनी घोषित केली होती. परंतु ट्विटरच्या समोर या प्लॅनमध्ये अजूनही अनेक सुरक्षेचे प्रश्न असल्यामुळे कंपनीकडून 29 नोव्हेंबरला लॉन्च करण्यात येणार नसल्याची माहिती मस्ककडून देण्यात आली आहे.
वाचा: तुम्ही गाडी चालवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!
मस्क यांनी ट्विटरवर अनेक बदल केलेत
एलन मस्कच्या हाती ट्विटरची धुरा आल्यानंतर त्यांनी अनेक बदल केले आहेत. त्यांनी सर्वप्रथम कंपनीच्या सीईओसह अनेक अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. त्यानंतर ट्विटर सबस्क्रिप्शनवर आधारित ब्लू टिक बनवले. अशा सर्व बदलांमुळे ते सतत चर्चेत येत आहेत.
व्हेरिफाईड ‘ब्लू टिक’चा युजर्सकडून गैरवापर
व्हेरिफाईड ‘ब्लू टिक’साठी सबस्क्रिप्शन (Blue Tick Subscription) सुरू केल्यानंतर बनावट खात्यांमध्ये वाढ झाली होती. एका युजरने त्याच्या खात्यावर सुपर मारिओचा फोटो वापरून आक्षेपार्ह ट्वीट केले होते. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने फार्मा कंपनी ‘इली लीली’ या नावाचा वापर करत इंन्सुलीन मोफत देण्यात येणार असल्याचे म्हटलं होते. या ट्वीटमुळे कंपनीला ग्राहकांची माफी मागावी लागली. ट्विटरच्या एका युजरने ‘टेस्ला’ कंपनीच्या सुरक्षा रेकॉर्डचीदेखील खिल्ली उडवली होती.