Twitter Will Launch Recommended Tweet Features: मस्क यांच्या मालकीच्या ट्विटरमध्ये गेल्या काही दिवसात अनेक बदल होत आहेत. जर तुम्हीही ट्विटर युजर्स (Twitter Users) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ट्विटरवर आता तुम्ही ज्यांना फॉलो करत नाहीत त्यांचंही ट्वीट दिसणार आहे. जास्तीत जास्त युजर्संना आकर्षित करण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी हे फीचर जोडण्यात आलं आहे. चांगला कंटेट देण्यासाठी युजर्संना सूचनाही दिली जाणार आहे. ट्विटरने याबाबत पोस्ट करताना लिहिलं आहे की, "'आम्ही ट्विटरवर सर्वोत्कृष्ट कंटेट पाहता यावा यासाठी युजर्संना रेकमेंडेड फीचर देणार आहोत. युजर्संना ते फॉलो करत नसलेल्या वापरकर्त्यांकडून ट्विट पाहण्याची परवानगी देते. युजर्सची आवड, ते फॉलो केलेले विषय, नेटवर्कमधील ट्विट्स हा आधार असेल."


क्वालिटीकडे लक्ष ठेवलं जाईल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीच्या मते रेकमेंडेड ट्वीट तुमच्या होम टाइमलाइनमध्ये एक्सप्लोर टॅब आणि ट्वीटदरम्यान दिसू शकते. कंपनीच्या मते, केवळ उच्च गुणवत्तेच्या कटेंट शिफारस केला जाईल याची खात्री करण्यासाठी रेकमेंडेशन टीमवर काम करत आहोत. ही टीम सर्व गोष्टींची काळजी घेतल्यानंतरच कोणत्याही युजरला कोणत्याही ट्विटची शिफारस करेल.


फीचर एडिट करण्याचा पर्याय


कंपनीने सांगितलं आहे की, रेकमेंडेड ट्वीट पर्सनलाइज करण्यासाठी काही टूल्स दिले आहेत. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अटींवर ट्विटर वापरण्यास सक्षम करण्याचा हा एक महत्त्वाचा भाग असेल. इतकंच नाही तर तुम्हाला ट्वीट मेनूमध्ये 'या ट्वीट/विषयामध्ये रस नाही' असा पर्यायही मिळेल. तुम्ही निवडलेले ट्वीट तुम्हाला दाखवले जाणार नाही.


बातमी वाचा- WhatsApp वरील 5 सेफ्टी फीचर्स, जाणून घ्या कशा पद्धतीने करतं काम


अ‍ॅपल आणि मस्क यांच्यात वाद संपुष्टात


ट्विटरचे प्रमुख एलोन मस्क यांनी अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतली. या भेटीनंतर अ‍ॅप स्टोअरमधून मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म काढून टाकण्याबद्दलचे गैरसमज दूर झाले आहेत. मस्कने अ‍ॅपल मुख्यालयाच्या भेटीचा व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले आहे की, "मला अ‍ॅपलच्या सुंदर मुख्यालयात नेल्याबद्दल टिम कुकचे आभार."