मुंबई : मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने आपली जनरल अकाऊंट व्हेरिफिकेशन सेवा सध्या सस्पेंड केली आहे. ट्विटरने यापूर्वी नुकतीच एक पॉलिसी बनवली होती. ज्याद्वारे कोणताही व्यक्ती अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी म्हणजेच, अकाऊंटला 'ब्लू टीक' घेण्यासाठी अप्लाय करू शकत होता. यापूर्वीह ही सेवा केवळ सेलिब्रिटी, सरकार आणि मीडियाशी संबंधीत लोकांसाठीच उपलब्ध होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरच्या नव्या निर्णयाबद्धल ट्विटरचा संस्थापक आणि सीईओ जॅक डोर्सीने ट्विट केले की, 'आमच्या एजंट्स व्हेरिफिकेशन पकलिसीसाठी आतापर्यंत योग्य पद्धतीने फॉलो करत आलो आहोत. मात्र, काही दिवसांपूर्वीच आमच्या लक्षात आले की, या प्रक्रियेत काहीतर गडबड आहे. जी दुरूस्त करणे आवश्यक आहे. खरेतर आम्हाला या प्रक्रियेवर या पूर्वीच काम करने गरजेचे होते. मात्र, आम्ही त्याकडे लक्ष देऊ शकलो नाही. ही आमची चूक आहे. आता आम्ही ती दुरूस्त करण्यावर जोरदार प्रयत्न करत आहोत.'



दरम्यान, ट्विटरच्या व्हेरिफिकेशन पॉलिसीविरोधात अमेरिकेकत अमेरिकेत मोठा गरादरोळ झाला होता. वर्जिनियातील आयोजीत व्हाईट सुप्रीमेसिस्ट रॅलीच्या आयोजकांना ब्लू टीक दिल्याबद्धल आंदोलक नाराज होते. या आंदोलनात एकाचा मृत्यूही झाला होता.



यावर ट्विटरने जाहीररित्या दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटले होते की, एखाद्याच्या अकाऊंटला व्हेरिफिकेशन टीक देण्याचा अर्थ त्या अकाऊंट किंवा त्या व्यक्तिच्या आवाजाला ओळख देणे इतकाच होता. मात्र, त्याचा विपर्यास करत ब्लू टीक असणे म्हणजे त्या अकाऊंटला ट्विटरचे समर्थ असने असा घेतला गेला. खरेतर लोकांमध्ये हा भ्रम आमच्यामुळेच निर्माण झाला. आता तो दूर करणे गरजेचे आहे. आम्ही आता त्यावर काम करत असून, अनेकांच्या अकाऊंटचे व्हेरिफिकेशन रोखण्यात आले आहे.