आता २८० कॅरेक्टर्समध्ये करू शकाल टिवटिवाट !
`ट्विटर` या लोकप्रिय मायाक्रोसाईट्ची ओळख म्हणजे १४० कॅरेक्टर्सची मर्यादा.
मुंबई : 'ट्विटर' या लोकप्रिय मायाक्रोसाईट्ची ओळख म्हणजे १४० कॅरेक्टर्सची मर्यादा.
कमीत कमी शब्दात तुमच्या मनातील भावना व्यक्त करणं हे कसब आहे. आणि ते सार्यांनाच जमते असे नाही. अनेक युजर्सना १४० कॅरेक्टर्स या मर्यादेमध्ये लिहणं कठीण जात होते.
ट्विटरला अनेक मेसेजिंग अॅप आणि फेसबुककडून असलेली तीव्र स्पर्धा पाहता या मर्यादेमध्ये थोडा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्विटरची शब्दसंख्या आता १४० हून २८० करण्यात येणार आहे. म्हणजेच ट्विटरच्या युजर्सना लवकरच दुप्पट जागा मिळण्याची शक्यता आहे.
ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी २४० कॅरेक्टर्सचे पहिले ट्विट केले आहे. २८० कॅरेक्टर्सची मर्यादासंख्या ही प्रायोगिक तत्त्वावर चालवली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास त्याबद्दल पुढे विचार केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या डिरेक्ट मॅसेज मध्येही वाढ करण्यात आली आहे. आता १०००० कॅरेक्टर्स मध्ये तुम्ही संदेश पाठवू शकता. फेसबुक मॅसेंजरवर सध्या २० हजार शब्दांचा संदेश पाठविण्याची सोय आहे.