नवी दिल्ली :  टाईपरायटरचा जमाना आता संपलाय... कॉम्प्युटरचं यूग सुरू होऊनही अनेक वर्षं उलटली आहेत. मात्र आता हाच टाईपरायटर आधुनिक बाज लेवून परत आलाय. 


रेट्रो टाईपरायटर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रेट्रो टाईपरायटर नावाचं एक उपकरण बाजारात आलंय. या रेट्रो टाईपरायटरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.



दिसायला आपल्या जुन्या टाईपरायटर सारखाच, त्याची बटणंही अगदी कडकड वाजणारी पण या टाईपरायटरचा उपयोग होतो तो टॅबवर टाईप करण्यासाठी.


टॅबला कनेक्ट
  
या रेट्रो टाईपरायटरच्या पुढच्या बाजुला एक सॉकेट दिलंय. यामध्ये टॅब खोचला की टाईपरायटर टॅबला कनेक्ट होतो. मग टाईपरायटरची बटणं दाबून टॅबवर टाईप करता येतं.