मुंबई : मोबाईल मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप गेल्या काही वर्षात वेगाने प्रसिद्ध होतंय. भारतामध्ये व्हॉट्सअॅपचे 20 कोटीहून अधिक वापरकर्ते आहेत. एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. त्यामुळे मागच्या काही वर्षांपासून व्हॉट्सअॅप आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलंय. कोणत्याही नात्यामध्ये भांडण होणं हे काही नवीन नाही...मग ते मित्र असो किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच कोणातंही भांडण... या भांडणाचा राग शांत होईपर्यंत एकमेकांना व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं जातं. जो पर्यंत समोरची व्यक्ती अनब्लॉक करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चॅट करण कठीण होऊन जात. पण आता यावरही एक शक्कल लढविण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला समोरच्या व्यक्तीने ब्लॉक केल्यास ही आयडीया वापरून तुम्ही स्वत:ला अनब्लॉक करु शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात आधी हे सुनिश्चित करा की नक्की तुमच्या फ्रेंडने तुम्हाला ब्लॉक केलंय का..जसं तुम्हाला माहितेय की समोरच्याने ब्लॉक केल्यावर आपल्याला त्याचा डीपी, स्टेटस, फोटो, लास्ट सीन काहीच दिसत नाही. असं काही दिसत नसेल तर समजून जा की समोरच्याने तुम्हाला ब्लॉक केलंय. 


हे पाहण्यासाठी एक आयडीया देखील आहे. ज्याने ब्लॉक केलंय असं तुम्हाला वाटतंय त्याला काहीतरी मेसेज पाठवा..जर एकच टिक दिसत असेल तर समजून जा त्याने तुम्हाला ब्लॉक केलंय.


असा करा अनब्लॉक 


सर्वात आधी व्हॉट्सअॅपच्या सेटींग्जमध्ये जा आणि व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट करा. 


व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट करण्यासाठी डिलीट माय अकाऊंटवर क्लिक करा आणि नंतर आपला नंबर टाका. 


नंबर एंटर केल्यावर आपल अकाऊंट डिलीट करा. 


त्यानंतर व्हॉट्सअॅप मेसेंजर अनइंस्टॉल करा. 


अनइंस्टॉल केल्यावर फोन रिस्टार्ट करा. 


प्ले स्टोअर वर जाऊन पुन्हा व्हॉट्सअॅप इंस्टॉल करा आणि पूर्ण माहिती टाका. 


आता तुम्ही स्वत:ला आपल्या फ्रेंडच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटवरून अनब्लॉक केलंय.