बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, वेतन ४५,९५० रुपये
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
नवी दिल्ली : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये २०० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया क्रेडीट ऑफिसर पदांसाठी होत आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करु शकतात.
या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांची बँकेच्या देशभरातील विविध शाखांमध्ये नियुक्ती केली जाऊ शकते. नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्ष उमेदवारांना प्रोबेशनचा काळ असणार आहे.
क्रेडीट ऑफिसरच्या २०० पदांसाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात येत आहेत. यापैकी ६२ पद खुल्या प्रवर्गासाठी, ६५ पद ओबीसी, ४९ पद एससी आणि २४ पद एसटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
इच्छुक उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून कमीत कमी ६० टक्क्यांसह पदवी मिळवणं गरजेचं आहे. ही पदवी एमबीए (फायनान्स)/ सीए / आयसीडब्ल्यूए / सीएफए यापैकी असावी. तसेच उमेदवाराचं कमीत कमी वय २३ वर्ष असावं आणि जास्तीत जास्त ३२ वर्ष असावं. निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना ३१,७०५ रुपयांपासून ४५,९५० रुपये वेतन देण्यात येईल.