मुंबई : खासगी मोबाईल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आता बीएसएनएल ही सरकारी कंपनी मैदानात उतरलेली दिसून येत आहे. सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने (BSNL) 47 रुपयांचा नवीन फर्स्ट रिचार्ज (First Recharge) बाजारात आणला आहे. नवीन रिचार्ज प्रीपेड ग्राहकांसाठी हा प्लान आहे. FRC 47 प्रथमच नवीन रिचार्जिंग ग्राहकांना उपलब्ध आहे. व्हॉईस कॉलिंग (voice calling), डेटा आणि एसएमएस लाभ या योजनेत उपलब्ध आहेत. देशातील बीएसएनएलने ऑफर केलेली ही स्वस्त अमर्यादित कॉम्बो प्रीपेड योजना आहे. ( BSNL plan of FRC 47) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एफआरसी 47 च्या बीएसएनएल योजनेत अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचे फायदे उपलब्ध आहेत. (Unlimited voice calling benefits are available in the BSNL plan of FRC 47) अर्थात ग्राहक राष्ट्रीय रोमिंग, एसटीडी आणि स्थानिक कॉल विनामूल्य करू शकतात. यात मुंबई आणि दिल्लीच्या एमटीएनएल नेटवर्कचा समावेश आहे. या रिचार्जमध्ये दररोज 14 जीबी डेटा आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत. बीएसएनएलचे स्पष्ट केले आहे की, या योजनेत मिळालेली ऑफर 28 दिवसांसाठी वैध आहे. म्हणजेच बीएसएनएल ग्राहक केवळ 47 रुपयांमध्ये अमर्यादित कॉम्बो प्लानचा लाभ घेऊ शकतात.


या योजनेतील सर्व अटी आणि शर्ती पीव्ही 107 रुपयांच्या प्रीमियम योजनेप्रमाणेच आहेत. याचा अर्थ असा की एफआरसी 47 योजनेची वैधता 100 दिवसांची आहे ज्यानंतर बीएसएनएल सिम कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी ग्राहकांना आणखी एक रिचार्ज करावे लागेल. एफआरसी 47 ही ऑफर 31 मार्च 2021 पर्यंत वैध आहे.


दरम्यान, बीएसएनएल एफआरसी 47 चेन्नई आणि तामिळनाडू टेलिकॉम सर्व्हीसमध्ये नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. लवकरच आता ही योजना दुसऱ्या सर्कलमध्ये लाँच केले जाऊ शकते. 20 फेब्रुवारीपासून या प्लानचे फायदे दिले जात आहेत.