Beatxp Marv Neo Smartwatch Discount: आजकाल स्मार्टवॉच ट्रेंडिगमध्ये आहे. व्यायाम करत असताना किंवा जिमनध्ये फिटनेस आणि हेल्थ ट्रॅक करण्यासाठी स्मार्टवॉट हमखास वापरले जाते. स्मार्टवॉचचा वाढता वापर पाहता त्याच्या किंमतीही वाढल्या आहेत. तुम्हीदेखील कमी किंमतीत चांगले फिचर्स असलेल्या स्मार्टवॉचच्या शोधात आहात तर Amazone वर Extra Happiness Days सेलमध्ये अनेक पर्याय तुम्हाला मिळणार आहेत. यात तुम्ही स्वस्तात पण मस्त स्मार्टवॉच खरेदी करु शकणार आहात. Amazone वर तुम्हाला 1,000 हून कमी किमतीत beatXP Marv Neo स्मार्टवॉचवर तगडं डिस्काउंट देण्यात येत आहे. या स्मार्टवॉचची किंमत आणि ऑफर्स जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

beatXP Marv Neo ची कीमत और फीचर्सः या स्मार्टवॉचची किंमत 6,499 इतकी आहे. मात्र, या स्मार्टवॉचवर तब्बल 85 टक्क्यांचे डिस्काउंट देण्यात येणार आहे. त्यांनंतर हे स्मार्टवॉच तुम्ही 999 रुपयांत खरेदी करु शकणार आहात. त्याचबरोबर 900 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देण्यात येणार आहे. या स्मार्टवॉचला जवळपास 8600 यूजर्सनी 4ची रेटिंग दिली आहे. 


स्मार्टवॉचचे फिचर्स


स्मार्टवॉचच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 1.85 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 560 निट्सचा पीक ब्राइटनेस असून ब्राइट डिस्प्लेदेखील व्हिजिबल आहेत. हे ब्लूट्यूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहे यामुळं फोन आरामात कनेक्ट करता येऊ शकतो. यात कॉलिंगच्या सुविधेचा लाभदेखील घेता येऊ शकतो. हे स्मार्ट व्हॉइस असिस्टंडदेखील देण्यात येत आहे. 


beatXP Marv Neoमध्ये IP68 रेटिंग देण्यात आली आहे. यामुळं हे स्मार्टवॉच वॉटरप्रुफ आहे. स्विमिंगचे शौकीन असलेले लोक हे स्मार्टवॉच घालून स्विमिंगदेखील करु शकता. हे वॉच अर्धा तासापर्यंत 1.5 मीटर पाण्यात राहू शकते. तर यात फास्ट चार्जिंग फिचर देण्यात आलं आहे.  त्याचबरोबर हेल्थ अपडेटही तुम्हाला कळणार आहात. हार्ट रेट सेन्सरपासून ते SpO2 पर्यंत इतर हेल्थ सेन्सरचा देण्यात आले आहेत. तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी हे स्मार्टवॉच घेईल. हे स्मार्टवॉच अत्यंत स्टायलिश असून कोणत्याही ड्रेससोबत मॅच होऊ शकणार आहे.