मुंबई : सध्या उन्हाळा सुरु आहे आणि उष्णता देखील नव-नवीन उच्चंक गाठत आहे. लोक उष्णतेने इतके त्रस्त झाले आहेत की, आता एसी शिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. तसे पाहाता सर्वांनाच एसी विकत घेणं परवडत नाही आणि तरी देखील एसी कशीतरी विकत घेतली तरी समोर समस्या उभी राहाते ती वीजेच्या बिलाची. एसी लावल्याने नक्कीच वीजेचं बिल जास्त येतं. परंतु तुम्हाला माहितीय का की असे देखील काही मार्ग आहेत, ज्यांमुळे एसी वापरुन देखील वीज बिल कमी येऊ शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला तर मग आज या उपायांबद्दल जाणून घेऊ या.


एसीच्या अतिवापरामुळे वाढत्या वीज बिलाचे टेन्शन लोकांच्या मनात येते. पण उन्हाळ्यात एसीपासून दिलासा मिळावा आणि वीज बिल जास्त येऊ नये असा काही उपाय आहे का? होय, आम्ही तुम्हाला एसी योग्य प्रकारे वापरण्याचे काही उपाय सांगत आहोत, ज्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल.


AC योग्य तापमानावर सेट करा


संशोधनात असे दिसून आले आहे की, तापमानात डिग्री कमी जास्त केल्याने सुमारे 6 टक्के विजेचा फरक पडतो. त्यामुळे तुमच्या एसीचे तापमान जितके कमी असेल तितकाच त्याचा कंप्रेसर जास्त काळ काम करेल, ज्यामुळे तुमचे वीज बिल वाढेल. त्यामुळे तुम्ही एसी त्याच्या डिफॉल्ट तापमानावर चालू ठेवण्याचे निवडल्यास, तुम्ही 24 टक्के विजेची बचत करू शकता. यामुळे तुम्हाला बाहेरच्या उष्ण वातावरणापेक्षा जास्त थंडावा नक्कीच मिळेल.


तुमचा AC 18 °C ऐवजी 24 °C वर ठेवा


जर तुम्ही दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये रहात असाल, जिथे तापमान दररोज 34℃ ते 38℃ पर्यंत असते. त्यामुळे तुमचा एसी जर तुम्हाला बाहेरच्यापेक्षा 10 अंश कमी करण्यामध्ये मदत करत असेल, तरी हा खूप मोठा फरक आहे. त्यामुळे तुम्ही AC 24 वर ठेवलात तरी, देखील तुम्हाला उष्णतेपासून थंडावा मिळेल.
अशा स्थितीत तुम्हाला तुमची सवय १८ अंशांवरून २३-२४ अंशांवर आणावी लागेल. या तापमानातही तुम्हाला योग्य थंडावा मिळत असल्याचे तुम्हाला समजेल.


तुमची खोली नीट बंद करा


जेव्हा आपण एअर कंडिशनर सुरु करतो, तेव्हा दार खिडक्या नीट बंद करणं गरजेचं आहे. कारण तुमच्या खोलीतील थंड हवा खोलीतून बाहेर जात असेल, तर मात्र तुमच्या AC ला जास्त काम करावं लागलं. ज्यामुळे वीज बिल जास्त येतं.


तसेच एसी वापरताना टीव्ही, फ्रीज, कॉम्प्युटर यासारखी विद्युत उपकरणे वापरणे टाळा कारण ही, उपकरणे खूप उष्णता निर्माण करतात. एसी चालू करण्यापूर्वी ते उपकरणं बंद करा, खोली थंड झाल्यावर तुम्ही ते पुन्हा चालू करू शकता. 


वीज वाचवण्यासाठी स्विच ऑन आणि ऑफ करा


तुम्ही कधी थरथर कापत उठलात आणि एसी बंद करावा लागला आहे का? खोली अत्यंत थंड ठेवण्यासाठी तुमचा एसी रात्रभर सुरू असल्यामुळे हे घडले असावे. ऊर्जेची बचत करण्याचा आणि आरामदायी राहण्याचा एक मार्ग म्हणजे AC रात्री बंद करणे.


विशेषत: जर तुम्ही दिवसभर AC चालवत असाल तर तुम्हाला रात्रीची AC चालवण्याची इतकी गरज भासणार नाही. जर तुम्ही एसी रूममध्ये जास्त वेळ घालवत असाल तर तुम्ही ही युक्ती अवलंबली पाहिजे.


एसी काही तास चालू ठेवा आणि नंतर एक-दोन तास बंद करा. यामुळे भरपूर विजेची बचत करता येईल. फक्त एसी लावलेली खोल सारखी बंद चालू करु नका, कारण यामुळे गरम हवा खोलीत शिरते आणि खोलीतील थंड हवा बाहेर निघून जाते.


एसीसोबत फॅन वापरा


AC चालू असताना सीलिंग फॅन चालू ठेवावा. याव्यतिरिक्त, छतावरील पंखे खोलीला हवेशीर ठेवतात आणि सर्व कोपऱ्यात थंड हवा पसरवतात. यामुळे तुम्हाला एसीचे तापमान कमी करावे लागणार नाही.
तसेच यामुळे तुम्ही कमी पॉवर वापरून अधिक कूलिंग मिळवू शकता. एसी चालू करण्यापूर्वी तुमच्या खोलीचा पंखा चालू करा जेणेकरून गरम हवा खोलीच्या बाहेर जाऊ शकेल, त्यानंतर तुम्ही तुमचा एसी चालू करू शकता.


एसी सेवा आणि साफसफाईमुळे विजेची बचत होईल: एसीच्या डक्ट आणि व्हेंट्समध्ये घाण साचत असल्याने एसीला थंड हवा खोलीत आणण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते.


घाणेरडा फिल्टर काढून नवीन फिल्टर बसवल्यास एसीचा ऊर्जेचा वापर ५ ते १५ टक्के कमी होतो. याशिवाय एसी खराब होण्यापासून आणि दुरुस्त होण्यापासूनही वाचतो.