मुंबई : जगभरात फेसबुकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यात भारतातील अनेक लोकांचे यावर अकाउंट आहे. येथे आपल्याला आपल्या मित्रांपासून ते अगदी लांबच्या नातेवाईकांपर्यंत आपल्याला सगळ्यांशी संवाद साधता येतो. यावर आपण आपले फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करु शकतो. ज्यामुळे आपले जवळचे देखील ते पाहू शकतील. एवढेच काय तर येथ तुम्ही ग्रुप देखील बनवू शकता. फेसबुकवर तुम्हाला अनोळखी लोकही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. ते तुमचे ऑफिसचे लोक किंवा शेजारीही असू शकतात. फेसबुक हे एक असे माध्यम आहे की, जिथे आपण आपल्या आयुष्याशी संबंधीत माहिती टाकतो. जे आपल्या फ्रेंडलिस्टमधील मित्र पाहातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु आपलं प्रोफाईल कोण पाहात आहे? हे काही आपल्याला कळत नाही. परंतु आता यासंबंधीत एक अशी ट्रिक समोर आली आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रोफाइलमध्ये कोण सारखं येतंय आणि कोण तुमच्या प्रोफाईला विझीट करतंय याची माहिती मिळवू शकता. 


होय हे शक्य आहे आणि तुम्ही ते सोप्या पद्धतीने कसं करु शकता? याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.


केवळ लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर शोधले जाऊ शकते


आम्ही तुम्हाला अशाच एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता की, तुमचे प्रोफाइल कोण चेक करत आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, ही युक्ती तुम्ही मोबाईलवर वापरू शकत नाही. ती फक्त लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरच पाहिली जाऊ शकते.


तुम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर लगेच तुमचा लॅटपॉट आणि डेस्कटॉप उघडा आणि या स्टेप्स फॉलो करा


या चरणांचे अनुसरण करा


- सर्व प्रथम, तुम्हाला ब्राउझर उघडावे लागेल आणि त्यात Facebook लॉग इन करावे लागेल.
- फेसबुकवर लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या प्रोफाइलवर जावे लागेल.
- त्यानंतर तुम्ही राईट क्लिक करा. तेथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील.
- तेथे तुम्हाला View Page Source वर जावे लागेल.
- व्यू पेज सोर्स पाहण्यासाठी तुम्ही CTRL+U कमांड देखील वापरू शकता.
- CTRL+F करून BUDDY_ID शोधा.
- त्याच्या समोर 15 अंक असतील, तुम्हाला ते कॉपी करावे लागेल.
-कॉपी केल्यानंतर तुम्हाला https://www.facebook.com/15 क्लिक करा आणि तेथे तो अंक टाका.
-त्यानंतर सर्च केल्यानंतर, तुमचं प्रोफाईल कोणी कोणी पाहिलं आहे, त्यांची नावं समोर येतील.