`जिओ`ची मक्तेदारी संपवण्यासाठी सरसावली ही कंपनी...
स्मार्टफो युझर्ससाठी एक खुशखबर आहे. आता, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर वापरणारं इंटरनेट आणखीन स्वस्त होण्याची चिन्हं निर्माण झालीत.
मुंबई : स्मार्टफो युझर्ससाठी एक खुशखबर आहे. आता, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर वापरणारं इंटरनेट आणखीन स्वस्त होण्याची चिन्हं निर्माण झालीत.
कोणती आहे ही कंपनी?
केवळ १ रुपयाला अनलिमिटेड डाटा सुविधा तुम्हाला मिळाली तर... हे अशक्य आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. रिलायन्स जिओ'नं टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री केल्यापासून बाजारात स्वस्त इंटरनेटसाठी मक्तेदारीसदृश्य परिस्थिती निर्माण केलीय. अशावेळी आपल्या ग्राहकांना पकडून ठेवणं इतर कंपन्यांसाठी आव्हान ठरतंय. 'जिओ'ची हीच मक्तेदारी संपुष्टात आणण्याचा विडा आता एका कंपनीनं उचललाय... आणि ती कंपनी म्हणजे, स्वस्त स्मार्टफोन-टॅबलेट बनवणारी 'डाटाविंड'... या कंपनीनं इंटरनेट डाटा स्वस्त दरात देण्याची घोषणा केलीय.
BSNL सोबत एमओयू
यासाठी, डाटाविंडनं बीएसएनएलसोबत एक करारही केलाय. यानंतर डाटाविंड एक रुपये प्रतिदिनमध्ये अनलिमिटेड डाटा आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहे. कंपनीचे प्रमुख सुनीत सिंह तुली यांनी या महिन्याच्या मध्यापर्यंत ही सेवा सुरू करण्याची घोषणा केलीय.
कंपनी यासाठी पेटेंट अॅप 'मेरानेट'चा वापर करणार आहे. 'मेरानेट' सर्वात अगोदर इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आलं. ग्राहकांचा उत्तम प्रतिसादही या कंपनीला मिळतोय.
कसा असेल स्पीड?
'मेरानेट'मध्ये इंटरनेटवर येणाऱ्या फाईल्स कंप्रेस्ड करून छोट्या केल्या जातात परंतु, त्याच्या गुणवत्तेवर मात्र कोणताही फरक पडत नाही... त्यामुळेच इंटरनेट स्पीड सेवाप्रदान करणाऱ्या कंपनीनुसार असेल... पण, ब्राऊजिंग स्पीड मात्र इतरांच्या तुलनेत अधिक असेल.
भारतात हे अॅप बीएसएनएलच्या नेटवर्कवर काम करणार आहे... ग्राहक जेव्हा या अॅपचा वापर करतील तेव्हा ग्राहकांचा डाटा नाही तर मेरानेटचा डाटा खर्च होईल.... आणि या अनलिमिटेड डाटाचा वापर करण्यासाठी ग्राहकांना केवळ प्रतिदिन एक रुपया खर्च करावा लागेल.
इतर कंपन्यांसोबत चर्चा
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, सध्या बीएसएनएलसोबत या सर्व्हिससाठी एमओयू साईन झालाय. भविष्यात रिलायन्स जिओ, एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोनसोबतही करार होऊ शकेल... तशी कंपन्यांसोबत चर्चाही सुरू आहे.