मुंबई : आपल्या पुण्यात हेल्मेट सक्ती केली तर अनेक स्थानिकांनी त्याला विरोध दर्शवला. पण, हेल्मेट किती गरजेचा आहे हे दाखवून देण्यासाठी हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये एक बाईकस्वार तरुण ट्रकच्या बाजूनं प्रवास करताना दिसतोय. अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट ट्रकच्या मागच्या चाकाखालीच सापडला... त्याचं डोक्याचा चेंदामेंदा झाला असेल असं बघ्यांना वाटत असतानाच तो तरुण सावरला आणि उठून उभा राहिला... हे कसं शक्य झालं हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ प्रत्यक्ष पाहावा लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात काही दिवसांपूर्वी लोकांनी हेल्मेट जाळत त्यावर अंत्यसंस्कार करत हेल्मेटसक्तीला विरोध दर्शवला होता. हेल्मेट कुणाचाही जीव वाचवण्यासाठी सक्षम नाहीत, असा दावा ते करत होते... उल्लेखनीय म्हणजे, भारतात दरवर्षी अनेक रस्ते अपघातात हजारो लोकांनी आपले प्राण गमावलेत.


परंतु, आयपीएस अधिकारी रोशन तिलक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करत हेल्मेटचा विरोध करणाऱ्यांना उत्तर दिलंय. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की बाईकस्वाराच्या डोक्यावरून ट्रकचं चाक गेल्यानंतर त्याचा चेंदामेंदा झाला परंतु, बाईकस्वाराला जखमही झाली नाही. प्रत्येक वेळीच हेल्मेटमुळे जीव वाचेल असं नसलं तरी त्यामुळे होणारी हानी मात्र निश्चितच कमी होईल.



रोशन तिलक हे २०१३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या नागपूर ट्राफिक डीसीपी पदावर ते कार्यरत आहेत. त्यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आत्तापर्यंत तो ८५ हजाराहून अधिक वेळा रि-ट्विट करण्यात आलाय.