मुंबई : अनुभवी स्मार्टफोन निर्माता Vivo ने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक विशेष ऑफर दिली आहे. या अंतर्गत स्मार्टफोनचा डिस्प्ले तुटल्यास कंपनी त्यांना मोफत स्क्रिन (Free Screen Replacement) बदलून देणार आहे. एवढेच नाही तर 10 हजार रुपयांपर्यंतचे अनेक फायदेही ग्राहकांना दिले जाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी ही ऑफर Vivo X60, Vivo V21 आणि Vivo Y सीरीजवर देत आहे. या ऑफर्स 11 ऑगस्टपासून सुरू झाल्या आहेत आणि 23 ऑगस्टपर्यंत सुरू राहतील. या दरम्यान, वापरकर्त्यांनी जर ई-कॉमर्स साइट्स जसे Amazon, फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवरुन नवीन स्मार्टफोन खरेदी केला, तर त्यांना या ऑफरचा लाभ घेता येईल. यावर त्यांना कार्ड ऑफर, ईएमआय ऑफर, वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट, मोफत लॅपटॉप बॅकपॅक, विस्तारित वॉरंटी यासारख्या उत्तम ऑफर मिळतील.


या स्मार्टफोनवर मोठी सूट


Vivo X60, Vivo V21 आणि Vivo Y सीरीजसह, HDFC, ICICI आणि Kotak Mahindra बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे 10 टक्के कॅशबॅक देखील दिला जात आहे. त्याचबरोबर बजाज फिनसर्व ट्रिपल झिरो ईएमआय योजनेअंतर्गत 10 टक्के पर्यंत कॅशबॅक दिला जाईल.


तसेच, Vivo X60, Vivo V21 आणि Vivo Y सीरीजवर 6 महिन्यांसाठी वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट देण्यात आली आहे. हे फोन नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत खरेदी केले जाऊ शकतात. यासह, 10 हजार रुपयांचे फायदे देखील दिले जात आहेत.


6 महिन्यांची एक्टेंडेड वॉरंटी


कंपनीच्या मते, ही ऑफर ओनमच्या (Onam) दृष्टीने जारी करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन Vivo फोन खरेदी करताना वापरकर्त्यांना खात्रीशीर भेटवस्तू दिल्या जात आहेत. या फोनसोबत मोफत बॅकपॅक दिला जाईल. यासाठी 15 हाजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची खरेदी केली पाहिजे.


तसेच, 15 हाजार रुपयांपेक्षा कमी उत्पादनांच्या खरेदीवर 6 महिन्यांची एक्टेंडेड वॉरंटी दिली जात आहे. विस्तारित वॉरंटी ऑफर 25 ऑगस्ट पर्यंत वैद्य आहे. या सर्व ऑफर विवोच्या मुख्य लाईन चॅनेलद्वारे उपलब्ध केल्या जात आहेत.