मुंबई : व्हिओचा अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरचा स्मार्टफोन भारतात २९ मेला लॉन्च होणार आहे. पण याची प्री-बुकींग भारतात आधीपासूनच सुरू झाली आहे. विवो एक्स २१ ची प्री बुकींग वीवोच्या ऑनलाईन स्टोरच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. प्री बुकिंग अमाऊंटवर दोन हजार रुपये आकारले जात आहे. व्हिओच्या या हॅंडसेटची प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना एक्सक्लुझिव प्री-बुकिंग ऑफर्सचा फायदा घेता येणार आहे.यामध्ये ५ टक्के कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआय सारख्या ऑफर्स असणार आहेत. विवो X २१ च्या किंमतीबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. पण हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. सर्वात आधी चीनने मार्चमध्येच हा हॅंडसेट लॉंच केला होता. 


कसं कराल बुकिंग ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही  विवो X २१ बुकिंग करु इच्छित आहात तर विवोच्या ऑनलाईन स्टोरला भेट देऊन दोन हजार रुपये अॅडव्हान्स पेमेंट करा. 
कंपनीतर्फे तुम्हाला अॅडव्हान्सच्या किंमतीचे कूपन मिळेल.  याचा वापर २९ मेला  विवो X २१ घेताना होणार आहे. 
Ferns N Petals चे १ हजार रुपयांच्या किंमतीचे गिफ्ट वाऊचर मिळेल. 
वोडाफोन रेड सबस्क्रायबर्सनादेखील १ वर्षाची डिवाईस वॉरंटी आणि २८० जीबी अतिरिक्त डेटा मिळेल. 
एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून ५ टक्के कॅशबॅक आणि १२ महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआय सारख्या ऑफर


किंमत 


विवो X २१ ची चीनमधील लॉंचिगवेळची किंमत ३७ हजार १०० रुपये आहे. सिंगापूरमध्ये ३९ हजार रुपये. भारतात याची किंमत किती असेल याबद्दल उत्सुकता आहे. 


फिचर्स 


६.२८ इंच एचडी+ (१०८०x२२८० पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले 
आस्पेक्ट रेशियो १९ : ९ 
ड्यूल सिम सपॉर्ट 
अॅण्ड्रॉइड ८.१ ओरियो आधारित फनटच ओएस ४.० वर चालणारा 


इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनिंग टेक्नॉलजी
क्वालकॉम स्नैपड्रैगन ६६० प्रोसेसर
अड्रेनो ५१२ जीपीयू और ६ जीबी रॅम
स्मार्टफोनमध्ये  अपर्चर एफ/१.८ सोबत १२ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि अपर्चर एफ/२.४ सोबत ५ मेगापिक्सल वाला ड्यूल रियर कॅमरा सेटअप 


पुढच्या बाजूस अपर्चर एफ/2.0, आईआर फिल लाइट आणि थ्री डी मॅपिंग


इतर फिचर्स 


१२८ जीबी इनबिल्ड स्टोरेज, मायक्रो एसडी कार्डने वाढवता येणारी 
 विवो X २१ कनेक्टिव्हिटी ४ जी ओएलटीई
वायफाय ८०२.११ एसी, ब्लूटूथ ५.०, 
जीपीएस/ए-जीपीएस आणि माइक्रो-यूएसबी 
३,२०० एमएएच बॅटरी
डाइमेंशन १५४.५x७४.८x७.४ मिलीमीटर