मुंबई: रिअलमी आणि शाओमीला टक्कर देण्यासाठी आता विवो कंपनी नवीन फोन दमदार फीचर्सने लाँच करत आहे. X60 च्या यशस्वी विक्रीनंतर आता विवो कंपनीने X70 सीरिज लाँच केली आहे. यामध्ये ग्राहकांसाठी Vivo X70, X70 Pro आणि X70 Pro+  असे फोन लाँच करण्यात आले आहेत. याची किंमत किती आणि काय फीचर्स असणार आहेत हे जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तिन्ही फोनमध्ये वेगवेगळे चिपसेट्स देण्यात आले आहेत. तिन्ही फोनमध्ये 12 GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे. X70 या फोनची 42 हजार 100 रुपये किंमत असणार आहे. या फोनमध्ये 8 GB RAM, 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. तर 8/256 GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत साधारण 45 हजार 500 रुपये असणार आहे. तर 12/256 व्हेरिएन्टची किंमत 49 हजार रुपये असणार आहे. 


Vivo X70 Pro या फोनमध्ये 8 GB RAM, 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. याची किंमत 52 हजार 400 रुपये असणार आहे. तर 8/256 GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत साधारण 54 हजार 700 रुपये असणार आहे. तर 12/512 व्हेरिएन्टची किंमत 57 हजार रुपये असणार आहे. 


Vivo X70 Pro+  या फोनमध्ये 8 GB RAM, 256 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. याची किंमत 62 हजार 700 रुपये असणार आहे. तर 12/256 GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत साधारण 68 हजार 300 रुपये असणार आहे. तर 12/512 व्हेरिएन्टची किंमत 79 हजार 700 रुपये आहे. 


प्रो फोनमध्ये काळा, निळा आणि नारंगी असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. तर उर्वरित फोनसाठी काळा, नेब्युला, पांढरा असे तीन पर्याय देण्यात आले आहेत.Vivo X70 या फोनमध्ये मोठी स्क्रीन, अॅम्युलेटेड डिस्प्ले, MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर, तीन कॅमेरा, प्रायमरी 40 आणि 12-12 असे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 44 वॅटचा चार्जर देण्यात आला आहे. तर याची बॅटरी 4,400 mAh आहे.