vivo च्या या मोबाईलमध्ये 10 जीबी रॅम ! जाणून घ्या फीचर्स
भारतामध्ये स्मार्टफोनच्या स्पर्धेमध्ये व्हिवोचे फोन आघाडीचे आहेत. या स्मार्टफोनच्या फ्लॅगशीपमध्ये VIVO ने अजून एक नवा फोन बाजारात येणार आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या फोनमध्ये हा सर्वाधिक रॅम असणारा मोबाईल ठरणार आहे.
मुंबई : भारतामध्ये स्मार्टफोनच्या स्पर्धेमध्ये व्हिवोचे फोन आघाडीचे आहेत. या स्मार्टफोनच्या फ्लॅगशीपमध्ये VIVO ने अजून एक नवा फोन बाजारात येणार आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या फोनमध्ये हा सर्वाधिक रॅम असणारा मोबाईल ठरणार आहे.
10 जीबी रॅम
Vivo च्या बाजारात येणार्या या मोबाईलचे नाव Xplay7 असणार आहे. या फोनचे फीचर लीक झाल्याचे वृत्त आहे. एका टेक्नोलॉजी वेबसाईटने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, Vivo च्या इतर मोबाईलप्रमाणे Xplay7 मध्येही सारखीच फीचर्स असणार आहेत. चीनच्या एका वेबसाईवर फोनचे फीचर्स लिक झाले आहेत.
फीचर्स काय ?
Xplay7 मध्ये 4K ओलेड डिस्प्ले, स्नैपड्रेगन 845 प्रोसेसर, 512 GB इंटरनल मेमरी आणि अंडरडिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. हा मोबाईल
256 GB आणि 512 GB मध्ये उपलब्ध होणार आहे.
ड्युएल रिअर कॅमेरा
2016 साली विवोने एक्सप्ले 6 (Xplay6) लॉन्च केला होता. त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता विवि एक्सप्ले 7 मध्येही (4X) ऑप्टिकल झूम, ड्युएल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
जर हा लीक झालेला रिपोर्ट आणि त्यामधील दावे खरे असतील तर विवोचा हा स्मार्टफोन आत्तापर्यंत लॉन्च झालेला सरवाधिक रॅम आणि इंटरनल स्टोरेजचा मोबाईल ठरणार आहे.