नवी दिल्ली :  भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने मेरू, ईझी आणि मेगा कॅब्ससोबत भागिदारी केली आहे. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्या अनेक संभाव्य करीत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचा एक भाग म्हणून व्होडाफोनने ग्राहकांना आकृष्ठ करण्यासाठी आणखी एक ऑफर दिली आहे. यात या टॅक्सीमध्ये यात्रा करणाऱ्या ग्राहकांना आपले व्होडाफोन सिम ४ मध्ये रुपांतरीत करू शकतो. 


तसेच फोन ४ जी अपग्रेट झाल्यावर ४ जीबी ४ जी डेटाही मोफत मिळणार आहे. आता या तीन कंपन्यांच्या टॅक्सीमध्ये ४ जी सिम मोबाईल डिस्पेंसर लावण्यात येणार आहे. यात सिमला अपग्रेड करण्याची पद्धतीही सांगण्यात आली आहे. यापैकी कोणत्याही टॅक्सीमध्ये तुम्ही बसला तर तुम्हांला सिम अपग्रेड करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. 


कॅब्समध्ये डिस्पेंसर्र्स असणार आहे. यात प्रीपेड आणि पोस्टपेड असे दोन प्रकारचा सिम किट असणार आहे. यात ग्राहकाचा गॅलरीत जाण्याचा वेळ वाचत आहे, तसेच सिम अपग्रेडेशनसह ग्राहकाला ४जीबी डाटा मिळणार आहे. 


हा फ्री प्रीपेड डेटा ग्राहकांना १० दिवसांच्या वैधतेसाठी देण्यात येणार आहे. तर पोस्टपेड ग्राहकांना हा फ्री डेटा पुढील बिलींग सायकलपर्यंत मिळणार आहे.