मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात वर्क फ्रॉम होम सुरू झालं. त्यानंतर कंपन्यांना ग्राहकांच्या गरजेनुसार अॅड ऑन पॅक आणि वर्क फ्रॉम होम अशा दोन सुविधा उपलब्ध करून दिल्या. तुमच्याकडे जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया तिन्ही कंपन्यांपैकी कोणतीही दोन सीमकार्ड आहेत. पण तुम्हाला एकच बेस्ट प्लॅन निवडायचा आहे तर कसा निवडाल? त्यासाठी आम्ही तुम्हाला आज मदत करणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

jio 599 प्लॅनमध्ये काय खास
या प्लॅनमध्ये ग्राहकांना दर दिवशी 2 GB डेटा मिळणार आहे. एकूण 168 GB डेटा मिळणार आहे. जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग. इतर नेटवर्कसाठी 3000 मिनिटं आणि दरदिवसाला 100 SMS फ्री मिळणार आहेत. डेटा संपल्यानंतरही 164Kbps स्पीडनं नेट सुरू राहिल. तर या प्लॅनची वैधता 84 दिवस असणार आहे.


Vodafone-Idea 599 plan
य़ा प्लॅनमध्ये ग्राहकांना दर दिवशी 1.5 GB डेटा मिळणार आहे. याशिवाय देशभरात आपण फ्री कॉलिंग करू शकणार आहात. अनलिमिटेड कॉलिंग, दरदिवशी 100 SMS अशी सुविधा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवस असणार आहे.


Airtel 599 plan
दोन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने खास प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग सुविधेसोबतच 2 GB डेटा रोज मिळणार आहे. 100 SMS सह 56 दिवसांची या प्लॅनची वैधता आहे. इतकच नाही तर हॉटस्टार आणि डिज्नी VIP मेंबरशिप मोफत मिळणार आहे. 


जर तुम्हाला कामानिमित्तान इंटरनेटचा जास्त वापर असेल आणि वैधताही जास्त हवी असेल तर जिओ किंवा एअरटेलपैकी कोणताही एक प्लॅन तुम्ही निवडू शकता. अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS तिन्ही प्लॅनमध्ये आपल्याला मिळणार आहेत. मात्र वोडाफोन-आयडियाचा प्लॅन जास्त महाग पडण्याची शक्यता आहे. तर एअरटेल कंपनी ग्राहकांना खास हॉटस्टार सेवा देत आहे.