मुंबई : खासगी भारतीय टेलिकॉम कंपनी, वोडाउोन आयडिया सातत्यानं त्यांच्या युजर्ससाठी काही आकर्षक प्लान्स आणि सवलती आणत असतात. आता म्हणजे त्यांच्या एका अशा ऑफरची जोरदार चर्चा सुरु आहे, ज्यामुळं दर महिन्याला कॅशबॅक सवलतीचा उपभोग युजर्सना घेता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Vodafone Idea चा बंपर धमाका
जर तुम्ही VI चे ग्राहक आहात, आणि हल्लीच 2G तून 4G स्किममध्ये आला आहात तर, तुम्हाला या सवलतीचा उपभोग घेता येणार आहे. एअरटेलनं ज्याप्रमाणे युजर्ससाठी ही सवलत आणली होती त्याचप्रमाणे आता Vi नंही अशीच सवलत 2G युजर्सना 4G कडे आकर्षित करण्यासाठी सुरु केली आहे. 


जर तुम्ही एक  2G स्मार्टफोनधारक आहात तर या सवलतीमध्ये पहिलावहिला 4G स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. बरं यातही तुम्ही जर 299 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचा प्रीपेड प्लान खरेदी करता तर कंपनीकडून तुम्हाला 100 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. 


हा कॅशबॅक सलग 2 वर्षे देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला एकूण 2,400 रुपये इतके पैसे परत मिळणार आहेत. यासाठी तुम्हाला दोन वर्षे 299 रुपये किंवा त्याहून जास्त किमतीचा रिचार्ज करावा लागणार आहे. 


हे विसरु नका... 
इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे तुम्हाला Vi App वरूनच रिचार्ज करावा लागणार आहे. कॅशबॅकही याच अॅपमध्ये मिळणार आहे. एका फोन नंबरवर एकाच वेळी ही ऑफर वापरता येणार आहे. 


दर महिन्याला मिळणाऱ्या या कॅश कूपनची व्हॅलिडिटी 30 दिवसांपर्यंत असेल. आहे की नाही ही जबरदस्त ऑफर?