नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या सातत्याने येणाऱ्या नवनव्या ऑफर्समुळे टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी तसेच नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या नवीन प्लॅन लॉन्च करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिओ बरोबरच एअरटेल आणि वोडाफोन कंपनीने काही आकर्षक प्लॅन सादर केले. त्याला युजर्सने चांगलाच फायदा घेतला. आता पुन्हा एकदा जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज पॅक लॉन्च केला आहे. 


प्रीपेड ग्राहकांसाठी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रीपेड ग्राहकांसाठी १९९ रुपयांचा नवीन रिचार्ज पॅक सादर केला आहे. त्यामुळे तुम्ही अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल करू शकता. त्याचबरोबर डेटा ची सुविधा देखील मिळेल. या प्रीपेड रिचार्जची किंमत १९९ रुपये आहे आणि व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. 


यापूर्वी १४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये  अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलची सुविधा मिळत होती. यात ३० दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉल आणि २८ दिवसांसाठी 2 GB डेटा मिळत होता. 


जिओचा प्लॅन 


त्याआधीचा प्लॅन १०४ रुपयांचा होता. त्यात २० पैसे प्रति मिनिटे कॉल दर होता. याशिवाय रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी १४९ रुपयांचा २८ दिवसांचा प्लॅन सादर केला. त्यात वॉयस कॉलची सुविधा २८ दिवसांची होती. त्यात 4.2 GB डेटा मिळत होता.