मुंबई : व्होडाफोनचं पेमेटं ऍप व्होडाफोन एम-पिसा वरुन तुम्हाला आता व्यवहार करता येणार नाहीत. एम-पिसा ऍप आता व्यवहार करण्यासाठी अवैध झालं आहे. आरबीआयने व्होडाफोनच्या या पेमेंट ऍपची मानत्या रद्द केली आहे. आरबीआयने २०१५ साली मोबाईल पेमेंटसाठी ११ कंपन्यांना सर्टिफिकेट ऑफ ऑथोरायजेशन लायसन्स दिलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्होडाफोनकडून हे लायसन्स परत दिल्यानंतर आरबीआय याच्या संचलनावर बंदी घालणार आहे. त्यामुळे व्होडाफोन ऍपमध्ये तुम्ही पैसे ठेवले असतील किंवा तुम्ही या ऍपच्या माध्यमातून पेमेंट करत असाल तर तत्काळ थांबवा. एम-पिसा अकाऊंटमध्ये पैसे असतील तर है पैसे काढून घेण्याच्या सूचना आरबीआयने केल्या आहेत.


व्होडाफोनने एम-पिसामधून मागच्या एका वर्षात पेमेंटचं काम जवळपास थांबवलं आहे. या ऍपला एखादी बँक विकत घेईल, अशी कंपनीला अपेक्षा होती, पण असं झालं नाही. त्यामुळे कंपनीकडे त्यांचं लायसन्स परत करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. एम-पिसा ऍप बंद झाल्यानंतर आता बाजारात पेटीएम, एयरटेल पेमेंट, गुगल पे, फोन पे आणि फ्री चार्ज ही पेमेंट ऍप सुरु आहेत.